शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एमआरआय, सिटी स्कॅन कागदावरच

By admin | Updated: December 22, 2016 22:45 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) एमआरआय यंत्रच नाही.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 22 - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो)  एमआरआय यंत्रच नाही. कालबाह्य झालेले सिटी स्कॅनही वारंवार बंद पडते. परिणामी, गरीब रुग्णाला पदरमोड करून बाहेरून निदान करावे लागते. विशेष म्हणजे, या दोन्ही यंत्राच्या खरेदीसाठी १७ कोटी ५० लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. विधिमंडळात या संदर्भात चर्चाही झाली आहे. परंतु आर्थिक तरतूद न झाल्याने ही दोन्ही यंत्रे अद्यापही कागदावरच आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेयोची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांना आधार वाटते. मात्र येथील अपुऱ्या सोईसुविधा आणि अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णांसाठी नवे दुखणे ठरत आहे. आजची उपचार पद्धती ही तंत्रावर ठरत असताना या तंत्राच्या बाबतीत मात्र मेयो पिछाडीवर पडले आहे. रोगाचे अचूक निदान करताना अडथळे येत आहेत. गरिबांचा जीव धोक्यात आला आहे. या दोन्ही यंत्राच्या खरेदीसाठी मेयो प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. परंतु मंजुरी मिळाली नाही. तीन महिन्यांपूर्वी डॉ. मीनाक्षी वाहाणे (गजभिये) यांनी अधिष्ठातापदाची सूत्रे हाती घेताच यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांना यात यश मिळाले. १.५ टेस्ला एमआरआयसाठी १० कोटी तर १२८ स्लाईस सिटी स्कॅनसाठी ७ कोटी ५० लाखांना नोव्हेंबर महिन्यात प्रशासकीय मंजुरी मिळाली. तसे पत्रही प्राप्त झाले. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. अधिवेशनात आर्थिक तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अधिवेशन संपले, परंतु निधी मिळाला नाही. यामुळे यंत्र मिळण्यास आणखी वर्ष लागण्याची शक्यता आहे.