शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

मार्इंच्या जाण्याने श्री सदस्य झाले पोरके

By admin | Updated: April 16, 2015 02:06 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता.

अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये अनिताताई धर्माधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने लाखो श्री सदस्यांचे मायेचे छत्र हरपले. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब, उमेश, सचिन, राहुल हे तीन चिरंजीव व प्रीती ही कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनितातार्इंच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे साठ हजारांपेक्षा अधिक श्री सदस्य बुधवारी सकाळीच रेवदंड्यात पोहोचले.चौलपासून रेवदंड्यापर्यंत श्री सदस्यांनी रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत शिस्तीत उभे राहून वाहनांना दिशादर्शक मार्गदर्शन केले.मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजलीअनिताताई यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पंडितशेठ पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, रायगड जि.प.अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक प्रताप गंभीर, रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, रायगड पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.अल्प परिचय च्अनितातार्इंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या गावात मध्यमवर्गीय खंडकर कुटुंबात २२ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. नलिनी असे त्यांचे माहेरचे नाव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंडणगड येथेच झाले. रेवदंड्यामधील निरुपणाची अनन्यसाधारण परंपरा जोपासलेल्या आणि त्याच माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबातील दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब यांच्याशी त्यांचा मार्च १९७४ मध्ये विवाह झाला.श्री सदस्यांचा मायेचा आधारस्तंभ हरपला धर्माधिकारी परिवाराकडून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या कार्यात मार्इंची भूमिका मोठी होती. त्यांच्या निधनाने श्री सदस्यांचा एक मायेचा आधारस्तंभ हरपला आहे.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री त्यांचे कार्य सुरू ठेवणे हीच श्रद्धांजलीडॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणातून समाजपरिवर्तनाचा वारसा आप्पासाहेब यांनी प्रभावीपणे सुरू ठेवला. त्यामध्ये त्यांना लाभलेली अनितातार्इंची साथ ही महत्त्वपूर्ण होती. त्यांचे कार्य पुढे अथक सुरू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.-प्रकाश महेता, पालकमंत्री, रायगडआप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे समाज प्रबोधनाचे कार्य त्यांच्या पश्चात आप्पासाहेबांनी अविरतपणे सुरुच ठेवले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी अनिताताईंचा सिंहाचा वाटा आहे. आप्पासाहेबांच्या त्या प्रेरणा होत्या. धर्माधिकारी कुटुंबीय आणि त्यांच्या श्री सदस्यांना मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर धर्माधिकारी कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसअनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड : अनिताताई या धर्माधिकारी कुटुंबाच्या आधारवड होत्या. नानासाहेब, शारदामाता गेल्यानंतर या कुटुंबासह श्री सदस्यांना सावरण्याचे काम त्यांनी केले. आप्पासाहेबांच्या कार्यामागे त्या सक्षमपणे उभ्या होत्या. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे. - प्रशांत ठाकूर, आमदार