शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची श्री अंबाबाई ‘घागरा-चोळी’मध्ये...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 04:48 IST

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात आल्याने कोल्हापूरकर

- लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात आल्याने कोल्हापूरकर आणि एकूणच भाविकांमधून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत होता. अंबाबाई मंदिराचा गाभारा पुजाऱ्यांच्या अधिकारात आहे. त्यामुळे ते गाभाऱ्यात करतील त्या सगळ्या गोष्टी योग्यच, असा अलिखित नियम आहे. शुक्रवारी असाच प्रकार झाला. श्री अंबाबाईला घागरा-चोळीचा पोषाख करण्यात आला. एका भाविकाने दिलेली ३५ हजारांची घागरा-चोळी आहे, असे सांगण्यात आले. देवीचा हा नव्या पोषाखातील फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आदिशक्ती असलेल्या श्री अंबाबाईची काठापदराच्या साडीतील सालंकृत खडी पूजा ही मुख्य पूजा. सणवाराच्या औचित्त्याने त्यात बदल केले जात असले तरी साडी या मूळ पेहरावाला धक्का लावण्यात आला नव्हता. ही परंपरा मोडण्याचा अधिकार पुजाऱ्यांना कुणी दिला, अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. अंबाबाईची साडी आणि खणा नारळाने ओटी भरणे हे नेहमीचेच. मात्र अंबाबाईला घागरा-चोळी वाहण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा.कायद्याचे व नियमांचे आणि देवीची बदनामी होणार नाही याचे भान जसे आम्ही ठेवतो, तसेच श्रीपूजकांनी परंपरांचे भान ठेवावे. अन्यथा भविष्यात या घटनांविरोधात कोल्हापूरकरांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.-संजय पवार, शिवसेना, कोल्हापूर जिल्हाप्रमुख उद्या, रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान शहरातील सर्व तालीम मंडळ व संस्था एकत्र येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदर पूजा बांधलेल्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. तसेच आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. हा प्रकार म्हणजे भक्तांच्या भावनांशी खेळ असून, त्याला आताच चाप लावला पाहिजे.- दिलीप देसाई, प्रजासत्ताक सामाजिक संस्था