शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी म्हणते, फौजदाराला वाढीव वयोमर्यादा लागू नाही

By admin | Updated: July 25, 2016 19:38 IST

फौजदार भरतीच्या सेवाप्रवेश नियमानुसार वाढीव वयोमर्यादा लागू नसल्याबाबतचे शपथपत्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुंबई मॅटपुढे (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) सादर केले आहे

मॅटपुढे शपथपत्र : पोलिसांची याचिका, होम-जीएडीच्या शपथपत्राची प्रतीक्षा, २७ जुलैला सुनावणी ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. २५  : फौजदार भरतीच्या सेवाप्रवेश नियमानुसार वाढीव वयोमर्यादा लागू नसल्याबाबतचे शपथपत्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुंबई मॅटपुढे (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) सादर केले आहे. या प्रकरणात आता गृहविभाग आणि सामान्य प्रशासन विभाग काय शपथपत्र दाखल करते याकडे राज्यभरातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बुधवार २७ जुलै रोजी यातील पुढील सुनावणी होणार आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने फौजदारांच्या ८२८ पदांसाठी २१ आॅगस्ट रोजी विभागीय मर्यादित परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. तीन ते सहा वर्ष सेवा झालेले पोलीस शिपाई फौजदाराची ही परीक्षा देऊ शकतात. एमपीएससीने खुल्या प्रवर्गासाठी ३५ वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी ४० वर्षे ही वयोमर्यादा ठेवली आहे. वास्तविक सामान्य प्रशासन विभागाने २५ एप्रिल २०१६ च्या आदेशानुसार ही वयोमर्यादा ३८ आणि ४३ अशी लागू केली आहे. हीच वयोमर्यादा एमपीएससीनेही लागू करावी व त्यानुसारच फौजदार पदाची परीक्षा देण्याची संधी पोलीस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारी याचिका पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी मुंबई ह्यमॅटह्णमध्ये दाखल केली आहे.

त्यावर मॅटचे न्या. मलिक यांनी एमपीएससी, गृहविभाग व सामान्य प्रशासन विभागाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात सोमवारी २५ जुलै रोजी सुनावणी झाली. त्याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. अरविंद बांदीवडेकर यांनी ह्यलोकमतह्णला माहिती दिली. अ‍ॅड. बांदीवडेकर यांनी सांगितले की, एमपीएससीने शपथपत्र दाखल केले, परंतु त्यात फौजदारांच्या सेवाप्रवेश नियमानुसार ३५ व ४० हीच वयोमर्यादा असून वाढीव वयोमर्यादा लागू नसल्याचे म्हटले आहे. परंतू त्यामागील नेमके कारण स्पष्ट केले नाही. शिवाय एमपीएससीने परीक्षेच्या तीन संधी ही अटसुद्धा घातली आहे. गृहविभाग व सामान्य प्रशासन विभागाने अद्याप शपथपत्र दाखल केले नाही.

गृह विभागातर्फे तर मॅटच्या आदेशाची प्रतच मिळाली नसल्याचे उत्तर दिले गेले. वास्तविक १३ जुलै रोजीच ही प्रत दिल्याचा पुरावाही दाखविण्यात आला. त्यावर ह्यमॅटह्णने तीव्र नाराजी व्यक्त करीत ह्यकन्टेम्प्टह्णची नोटीस द्यायची काय, पोलीस परिक्षेची तयारी केव्हा करणार? अशी विचारणा केली. दोन दिवसात होम व जीएडीने शपथपत्र दाखल करावे, २५ एप्रिलचा वाढीव वयोमर्यादेचा जीआर लागू आहे की नाही तेवढे सांगावे, अन्यथा तो लागू आहे असे समजले जाईल, असेही न्या.मलिक यांनी सांगितल्याचे अ‍ॅड. बांदीवडेकर म्हणाले. या प्रकरणात आता २७ जुलै रोजी सुनावणी होत आहे. एमपीएससीची ३५ व ४० ही वयोमर्यादा ओलांडलेल्या परंतु फौजदार होण्याची मनिषा बाळगणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचे ह्यमॅटह्णच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.