शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुलेंच्या जीवनावर चित्रपट

By admin | Updated: May 3, 2016 02:06 IST

थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर राज्य शासन पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करणार असून त्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर राज्य शासन पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करणार असून त्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तत्कालिन आघाडी सरकारने २४ जुलै २००२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत जोतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार हा चित्रपट केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि मध्यप्रदेश शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्याचे ठरविण्यात आले होते. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावर (एनएफडीसी) सोपविण्यात आली होती. चार वर्षाच्या कालावधीत चित्रपट पूर्ण करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी १० कोटी रु पयांचा खर्च गृहित धरण्यात येऊन महाराष्ट्र शासन त्यातील अडीच कोटींचा खर्च उचलणार होते. उर्वरित साडे सात कोटी खर्चातील पाच कोटी केंद्र शासन आणि अडीच कोटी मध्यप्रदेश सरकारकडून करण्यात येईल, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, केंद्र व मध्य प्रदेश शासनाकडून त्यांचा हिस्सा मिळाला नाही. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने चित्रपटासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर केला आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्यानंतर त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या यंदाच्या १२५ व्या स्मृती वर्षात हा चित्रपट तयार होऊन प्रदर्शित झाल्यास त्याचे औचित्य साध्य होईल. त्यामुळे याबाबत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली तातडीने कार्यवाही केली जावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)