मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बोगस पदवीच्या निषेधार्थ आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ‘बोगस पदवीदान’ आंदोलन केले, तर काँग्रेसने तावडेंच्या अटकेची मागणी केली. विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब विनोद तावडे यांची मंत्रीपदावरून उचलबांगडी करून कारागृहात रवानगी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. विनोद तावडे यांच्या बोगस पदवीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने आझाद मैदानावर मोर्चा काढला. या वेळी विनोद तावडे यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या प्रतींची होळी करण्यात आली.
तावडेंविरोधात ठिकठिकाणी आंदोलने
By admin | Updated: June 24, 2015 02:19 IST