शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीचे विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली

By admin | Updated: April 15, 2016 02:08 IST

राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली.

अहमदनगर : राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यांत नियुक्त करण्याच्या दिलेल्या शपथपत्राची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होण्याच्या भितीने विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरु असल्याचे सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती सध्या संस्थानचा कारभार पाहत आहे. साईबाबांच्या महासमाधी शताब्दी महोत्सवाची विविध कामे करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी संस्थानने न्यायालयात परवानगी मागितली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी तीन महिन्यांत व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे शासनाने १४ जानेवारीला न्यायालयात सांगितले होते.जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता हा धोरणात्मक निर्णय असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच निर्णय होईल, असे सांगण्यात आले. यापूर्वी २००४ ते २०१२ अशी सलग नऊ वर्षे माजी आमदार व विखे समर्थक जयंत ससाणे हे संस्थानचे अध्यक्ष होते. २०१२ साली केलेल्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे त्या रद्द कराव्या लागल्या होत्या. (प्रतिनिधी)कदम, कोल्हेयांची नावे चर्चेत भाजपाचे माजी आमदार व संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर कदम यांचे नाव संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. आमदार स्रेहलता कोल्हे यांचेही नाव चर्चेत आहे. अनेक इच्छुकांनी वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेटी घेतल्याचे समजते. विखे यांचेही विशेष लक्ष शिर्डी संस्थान हे विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे संस्थानवर कोणाची निवड होते, याकडे विखे यांचेही विशेष लक्ष आहे. संस्थानवरील नियुक्त्या लांबणे हे त्यांच्यासाठी सोयीचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.