शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची चळवळ मुंबई दरबारी

By admin | Updated: May 5, 2017 00:14 IST

मसाप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मराठीच्या अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा

सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीश: पाठपुरावा करणार आहोत,’ अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मसाप, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भिलार येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय ‘मसाप’ने घेतला होता. मात्र, बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, ‘भाजप’च्या प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पाचगणीच्या हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून दिली. भिलार गावात आंदोलन करण्यासाठी अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, वजीर नदाफ, सचिन धुमाळ, सतीश घोरपडे, सुरेंद्र वारद, प्राचार्य रवींद्र येवले, शाहूपुरी, फलटण शाखेसह सातारा जिल्ह्यातील सर्व शाखांचे प्रतिनिधी अंदोलन करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असा शब्द मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा विनोद कुलकर्णी यांनी केली.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॅप्टर भिलार गावच्या हेलीपॅडवर आल्यानंतर वेद पठणाने त्यांचे स्वागत करण्यात आल्याचे सांगून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)सरपंचांच्या घरी घेतली भेटभिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. गुरुवारचा कार्यक्रम आगळावेगळा असल्याने साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने आले होते.भिलारच्या औदार्याची चित्रफितीतून माहितीया कार्यक्रमात‘पुस्तकाचं गाव भिलार’ यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासीयांनी दाखविलेल्या औदार्याची माहिती मिळाली.भिलार येथील सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच एका व्यक्तीने कर्जमाफीच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्याला बाहेर नेले.