शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळांचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 03:57 IST

गेल्या काही वर्षांत मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठी शाळेतील घटत्या विद्यार्थी संख्येबरोबरच सरकारही या शाळांना सापत्न वागणूक देत आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांत मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठी शाळेतील घटत्या विद्यार्थी संख्येबरोबरच सरकारही या शाळांना सापत्न वागणूक देत आहे. मराठी शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत, मराठी शाळांचा प्रश्न सोडवण्यासाठी आता दीर्घकालीन आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचा सूर आळवला. या चर्चेत हक्कासाठी न्यायालयाची पायरी चढायची का? हा देखील विचार सुरू झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये रविवारी मराठी शाळांच्या प्रश्नांवर एका बैठकीचे आयोजन शिक्षणहक्क समन्वय समिती, मराठी अभ्यास केंद्र आणि पंचतत्त्व सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या बैठकीमध्ये स्वयंअर्थसहाय्यित मराठी शाळा, बृहद् आराखड्यासंदर्भातील बाधित शाळा, विनाअनुदानित मराठी शाळा आणि मराठी शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न या विषयावर चर्चा करण्यात आली. मराठी शाळांमधील शिक्षकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकालीन आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. याची पहिली पायरी म्हणून मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन देऊन प्रश्न समजवण्यात येणार आहेत. शिक्षण अधिकार कायद्याचा चुकीचा अर्थ लावून काही कलामांचा आधार घेत पुण्यातील शाळा बंद करण्यास शिक्षण विभाग सरसावला होता, पण त्यांचा हा डाव पुण्यातील मराठी शाळांनी एकत्र येऊन हाणून पाडला. आताही शिक्षण विभाग याच प्रयत्नात असल्याची टीका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केली. स्वयंअर्थसहाय्यित मराठी शाळांची परिस्थिती सध्या बिकट आहे. या शाळांकडे सरकार दुर्लक्ष करते आहे. मात्र, दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सहाय्य केले जात आहे. सर्व काही संस्थाचालक आणि शाळांवर जबाबदारी देऊन अंग काढून घेत आहे, असे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)