शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:05 IST

महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर घेण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

पुणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून १२ जागांसाठी होणारी निवडणूक महापालिका व नगर परिषदांच्या निवडणुकांनंतर घेण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठीच नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता ६० दिवस अगोदर लावण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.विधान परिषदेची निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका व नगर परिषदांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे पक्षीय बलानुसार त्यांचेच सर्वाधिक आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका व नगर परिषदांमध्ये निवडणुकांमध्ये भाजपाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतील, त्यामुळे या निवडणुकांनंतर विधान परिषदेची निवडणूक झाल्यास त्याचा भाजपाला मोठा फायदा होऊ शकेल, असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानापूर्वी केवळ ३५ दिवस अगोदर आचारसंहिता लावली जाईल असा धोरणात्मक निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता १५ नोव्हेंबरनंतर लागणे अपेक्षित होते, मात्र राज्य निवडणूक आयोगाने अचानकपणे ६० दिवस अगोदरच निवडणुका जाहीर करून आचारसंहिता लागू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता चालू असताना त्याच्या सदस्यांचे मतदान घेणे योग्य नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.>शहरातील काही वरिष्ठ पदाधिकारी नुकतेच राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, ते अनवधानाने विधान परिषदेची निवडणूक पुढे जाणार असल्याचे बोलून गेले असल्याचा किस्साही पालिका वर्तुळात चर्चिला जात आहे. एव्हाना जर केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तरी त्याविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचीही तयारी विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, तर त्याला विरोधी पक्षांकडून प्रचंड विरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.