शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमजीएसवाय’च्या निधीसाठी आंदोलन

By admin | Updated: October 8, 2015 01:41 IST

‘पंतप्रधान ग्रामसडक’ योजनेचे (पीएमजीएसवाय) दीड हजार कोटी रुपये केंद्र सरकारने जारी करावेत, यासाठी महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

यवतमाळ : ‘पंतप्रधान ग्रामसडक’ योजनेचे (पीएमजीएसवाय) दीड हजार कोटी रुपये केंद्र सरकारने जारी करावेत, यासाठी महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता नवी दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार या कंत्राटदारांनी केला आहे.राज्यात या योजनेंतर्गत तीन हजार कोटी रुपयांच्या कामांपैकी सुमारे हजार कोटींची कामे पूर्णही झाली. मात्र, या कामांचा मोबदला केंद्र सरकारकडून मिळालेला नाही. त्यामुळे उर्वरित कामे ‘जैसे थे’ स्थितीत सोडून देण्यात आली. निधी मिळविण्यासाठी पीएमजीएसवायच्या यंत्रणेने मुंबई-दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार केला.दुसरीकडे कंत्राटदार मंडळीही आपली दीड हजार कोटींची थकीत देयके मिळावीत, म्हणून रस्त्यावर उतरली. त्यांनी आधी मुंबईत सचिवांच्या कार्यालयात व नंतर दिल्लीत धरणे आंदोलन केले. त्यावेळी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करीत आपण यातून मार्ग काढू, तुम्ही उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली होती. त्यांना प्रतिसाद देत कंत्राटदारांनी दिल्लीतील उपोषण मागे घेतले. पंकजा मुंडेंनी गत महिन्यात दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना भेट मिळाली नाही. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने मंजूर निधीतील दीडशे कोटीसुद्धा अद्याप महाराष्ट्र सरकारला पाठविलेले नाही. राज्य सरकारनेसुद्धा आपला २५ कोटी रुपयांचा वाटा पीएमजीएसवायला दिलेला नाही. त्यामुळे पीएमजीएसवाय यंत्रणेसह कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे आता कुणाच्याही मध्यस्थीला बळी पडायचे नाही, निधी प्रत्यक्ष रिलीज होईपर्यंत संसदेपुढे उपोषण कायम ठेवायचे, असा निर्धार कंत्राटदारांनी केला आहे.