शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली

By admin | Updated: June 27, 2014 00:33 IST

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची झाली.

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची झाली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये बारामती विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीचे शिल्पकार, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे काही प्रमाणात मनोधैर्य खचलेल्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी निवडणुकीत दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावरच बारामती विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. 
बारामती विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या वतीने अॅड. राजेंद्र काळे, अपक्ष शेतकरी कृती समितीचे नेते रंजन तावरे स्वतंत्रपणो लढले. त्यामुळे मोठय़ा फरकाने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार विजयी झाले. सर्व विरोधकांना मिळून 7क् हजार मते मिळाली होती. तर अजित पवार सव्वा लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मागील वर्षभरात बारामती तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागात असंतोष होता. आंदोलने झाली; मात्र लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील, असे चित्र होते. प्रत्यक्षात तसे जाणवले नाही. मात्र, प्रचाराचा अभाव असताना देखील महादेव जानकर यांना 52 हजार मते बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक नेत्यांनी कंबर कसली आहे. 
भाजपचे नेते बाळासाहेब गावडे, शिवसेनेचे अॅड. राजेंद्र काळे, भाजपाचे दिलीप खैरे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, रंजन तावरे यांच्यापैकी एकमत करून राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा विचार सुरू आहे. 
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद लावली जाईल, असे सांगितले होते.  बारामतीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी महायुतीला मोठे दिव्य पार करावे लागणार आहे. विशेषत: पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे विरोधकांचा मुद्दा मोडीत काढण्यासाठी येत्या दोन- तीन महिन्यांत ते लक्ष देतील.  बदलत्या समीकरणात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पवार कुटुंबातील नवा चेहरा  रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अद्याप पक्षपातळीवर कोणतीही चर्चा नाही, परंतु कार्यकत्र्यामध्ये आहे.  राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होईल. बसपासह 
अन्य उमेदवारही असतील. 
(प्रतिनिधी)
 
राष्ट्रवादीरमेश थोरात1,28,564
अपक्ष रंजन तावरे25, 747
शिवसेनाअॅड. राजेंद्र काळे19, 627
रासपदशरथ राऊत6, क्42