शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

विधानपरिषद बरखास्त करण्याच्या हालचाली?

By admin | Updated: April 1, 2017 03:29 IST

विधान परिषद बरखास्त केल्यास पहिला फटका भाजपाचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तर दुसरा फटका शिवसेनेच्या चार कॅबिनेट मंत्र्यांना

अतुल कुलकर्णी / मुंबई विधान परिषद बरखास्त केल्यास पहिला फटका भाजपाचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तर दुसरा फटका शिवसेनेच्या चार कॅबिनेट मंत्र्यांना बसणार आहे. हे माहीत असतानाही भाजपाने आ. अनिल गोटे यांच्या विधानाचा राजकीय लाभ उठवत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दोन दिवस अस्वस्थ करून सोडले. मिळालेल्या माहितीनुसार भाजपातील काही ज्येष्ठे नेते मंडळी यावर गंभीरपणे विचार करत आहेत.आ. गोटे यांचे ते व्यक्तिगत मत आहे व त्या मताशी आपण आणि आपले सरकार सहमत नाही, त्याचे आपण समर्थन करत नाही असे निवेदन जरी मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केले असले तरी पडद्याआड वेगळ््याच हालचाली सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार जय्यत तयारीनिशी परिषदेत गेले होते. पण त्यांना म्हणणे मांडण्याची वेळ आली नाही. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनातील बैठकीत त्यांनी कायदे व नियम यांची जंत्रीच ठेवल्याचे समजते. लोकमतशी बोलताना ते म्हणाले, राज्यघटनेच्या अनुच्छेद १६९ मध्ये राज्यातील विधान परिषद बरखास्त करणे किंवा निर्माण करणे याची तरतूद आहे. विधान परिषद बरखास्त वा निर्माण करण्यासाठी विधानसभेत दोन तृतीयांश मताने ठराव संमत करणे बंधनकारक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कलमाचा आधार घेऊन काही महिने परिषद बरखास्त करायचा आणि नंतर काही महिन्यांनी पुन्हा निर्माण करण्याचा भाजपात गंभीरपणे विचार चालू आहे. असे केल्यास नवे सदस्य तिथे येतील. त्यामुळे विरोधकांचे सध्या सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्नही थांबतील आणि काही आक्रमक विरोधी नेत्यांना आडकाठी बसेल असेही डाव आखले जात असल्याचे समजते.विधानसभेत २८८ पैकी दोन तृतियांश म्हणजे १९२ सदस्य होतात. भाजपाचे १२३ व शिवसेनेचे ६२ असे एकूण १८५ सदस्य आहेत. शिवाय १० अपक्षांचा सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे असा ठराव आणता येतो. ही आकडेमोडही भाजपाच्या नेत्यांनी सभापतींनाच ऐकवल्याचे समजते.आमच्या नेत्यांनी हा विषय थांबवा, असे मला सांगितले. त्यांचा आदेश मान्य आहे. पण मी माझ्या मतांवर ठाम आहे. मी पक्षशिस्त पाळेन. पण माझ्यावर हक्कभंग आणावा, म्हणजे माझे मत कसे बरोबर आहे, हे मला सांगता येईल. - आ. अनिल गोटेविधानसभा आणि विधान परिषद ही घटनेने तयार केलेली सभागृहे असून, दोन्ही सभागृहे सार्वभौम आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमदारांना दुसऱ्या सभागृहाचा अवमान करणारे मत मांडता येणार नाही. राज्यसभा व विधान परिषद हे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. त्यांचा मानसन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाचे राज्य सरकार म्हणून आणि वैयक्तिकरित्याही आपण समर्थन करत नाही.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीपूर्वेतिहास १९५६ मध्ये मद्रास, १९६९ मध्ये पंजाब व पश्चिम बंगाल तर १९८५ मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषद असाच ठराव करून बरखास्त करण्यात आली. नंतर आंध्र प्रदेश विधान परिषद ठरावाद्वारे पुन्हा निर्माण करण्यात आली. महाराष्ट्रात विधान परिषद बरखास्तीचे अशासकीय ठराव यापूर्वी २६ सप्टेंबर १९५३, १२ डिसेंबर १९५३ व १४ डिसेंबर १९५३ मध्ये एस. डी. कोठावळे, यांनी मांडले होते व तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्याला उत्तर दिले होते. तर २५ जुलै १९६१ रोजी एस.जी. वर्टी, तर केशवराव धोंडगे, निहाल अहमद यांनी बऱ्याचदा असे ठराव दिले होते.सध्या बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी विधान परिषद आहे.