शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सगळ्याच पक्षांची पळापळ

By admin | Updated: September 27, 2014 00:11 IST

राजकीय उलथापालथी : सर्वच पक्षांतील उमेदवारी निश्चितीचा घोळ कायम

सांगली : आघाडी व महायुती तुटल्यानंतर आज (शुक्रवारी) दिवसभर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांची उमेदवार निश्चितीसाठी पळापळ सुरू होती. राष्ट्रवादीचे नेते दिवसभर कार्यालयात बसून इच्छुकांची चाचपणी करीत होते, तर काँग्रेसमध्ये मिरज, तासगावबाबत खल रंगला होता. सायंकाळी मिरजेतील उमेदवारी बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपने विद्यमान आमदार संभाजी पवार, प्रकाश शेंडगे यांचा पत्ता कट केल्याने खळबळ उडाली. संभाजी पवार व त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधत निवडणुकीसाठी शड्डू ठोकला, तर राष्ट्रवादीने प्रकाश शेंडगेंसाठी गळ टाकला. रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची शोधमोहीम सुरू होती. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता उद्याचाच दिवस राहिला आहे, मात्र सर्वच राजकीय पक्षांना तुल्यबळ उमेदवारांची चणचण भासत आहे. आघाडी तुटल्याने राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली आहे. ऐनवेळी जत, पलूस-कडेगाव, सांगली, मिरज या चार मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच राष्ट्रवादीपुढे निर्माण झाला होता. त्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील दिवसभर जिल्हा कार्यालयात ठाण मांडून होते. जतमधून भाजपने तिकीट कापलेले आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते. पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्यांना कार्यालयात बोलावून चर्चा करण्यात आली. निवडून येण्याची क्षमता, या निकषावर इच्छुकांची चाचपणी झाली. शेंडगे यांना डावल्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याची तयारी चालविली आहे. पलूस-कडेगावमधून अरुण लाड यांनी उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसमध्येही मिरजेतील उमेदवारीचा घोळ सायंकाळपर्यंत कायम होता. पतंगराव कदम यांनी सिद्धार्थ जाधव यांच्या नावाची घोषणा केली होती, पण त्यांना इतर इच्छुकांनी विरोध केला. उमेदवारी बदलण्यासाठी दिल्लीपर्यंत धाव घेतली. सायंकाळी सी. आर. सांगलीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. मिरजेत त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. तासगाव, इस्लामपूर, जत या तीन मतदारसंघांतील उमेदवारी निश्चित करण्यासाठी काँग्रेसमध्ये खलबते सुरू होती. भाजपने आ. संभाजी पवार यांचा पत्ता कट करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर पवार यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. ठाकरे यांनी त्यांना हिरवा कंदील दाखविल्याने पवार यांचे पुत्र पृथ्वीराज शिवसेनेच्या चिन्हावर रिंगणात उतरणार आहेत. भाजपने सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत गटाने जल्लोष केला. जतमधून प्रकाश शेंडगे यांचे तिकीट कापून विलासराव जगताप यांना देण्यावर शिक्कामोर्तब झाले. मनसेने मिरज व इस्लामपूर येथून अनुक्रमे नितीन सोनवणे व उदय पाटील यांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत मनसेने आठपैकी सहा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसमधील तासगाव, इस्लामपूर, जतमधील घोळ आजही कायम होता. (प्रतिनिधी)निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूरकाँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या जिल्ह्यातील तुल्यबळ पक्षांत एकीकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना, आयात उमेदवारांवरून निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. राष्ट्रवादीतून योगेंद्र थोरात इच्छुक आहेत. पण काँग्रेसमधून आलेल्या सिद्धार्थ जाधव व बाळासाहेब होनमोरे यांच्याभोवतीच उमेदवारीची चर्चा सुरू असल्याने थोरात समर्थक नाराज होते. हीच स्थिती भाजपमध्येही होती. संभाजी पवार यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या निष्ठावंतांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. शिवाजी डोंगरे यांनाही डावलल्याने त्यांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. निष्ठावंतांना न्याय कधी मिळणार?, असा सवाल आता कार्यकर्ते करू लागले आहेत. पलूस कडेगाव मतदारसंघातील उमेदवार निश्चितीसाठी राष्ट्रवादीला घाम गाळावा लागत होता. पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांना गळ घातली होती. पण दोघांनीही नकार दिला. पलूसचे माजी जि. प. सदस्य बापूसाहेब येसुगडे यांनीही नकार दिल्याने पलूस-कडेगावच्या उमेदवारीची कोंडी कायम आहे. सांगलीतून शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांनी राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याने या मतदारसंघातील इच्छुकांत नाराजी पसरली होती. एक इच्छुक बैठकीतून नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा राष्ट्रवादी कार्यालयात होती, तर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान हे इच्छुक कार्यालयातच तळ ठोकून होते. गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली होती. मनसेला धास्तीदुपारपासून मुंबईत शिवसेना व मनसेच्या युतीची चर्चा सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील मनसे उमेदवारांचा रक्तदाब वाढला होता. मनसेने आतापर्यंत आठपैकी सहा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेने सांगलीतून पृथ्वीराज पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, तर मनसेने अ‍ॅड. स्वाती शिंदे, इस्लामपुरातून शिवसेनेने भीमराव माने, तर मनसेने उदय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भविष्यात शिवसेना-मनसे यांचे सूर जुळले, तर मनसेच्या उमेदवारांवर गंडांतर येणार आहे. मतदारसंघ काँग्रेसराष्ट्रवादीभाजप शिवसेना इतरसांगली मदन पाटील दिनकर पाटील सुधीर गाडगीळपृथ्वीराज पवारअ‍ॅड. स्वाती शिंदे,सुरेश पाटीलशिवाजी डोंगरेमिरजसी. आर. सांगलीकरबाळासाहेब होनमोरेसुरेश खाडेतानाजी सातपुतेआनंद डावरेप्रा. सिद्धार्थ जाधवनितीन सोनवणेतासगाव-महादेव पाटीलआर. आर. पाटीलअजितराव घोरपडेजयसिंग शेंडगेसुधाकर खाडेक.महांकाळसुरेश शेंडगेवाळवाजितेंद्र पाटीलजयंत पाटीलविक्रम पाटीलभीमराव मानेबी. जी. पाटीलपलूस-पतंगराव कदमसुरेखा लाडपृथ्वीराज देशमुखलालासाहेब गोंदीलसंदीप राजोबाकडेगावमोहनराव यादवसंजय विभुतेशिराळासत्यजित देशमुखमानसिंगराव नाईकशिवाजीराव नाईकनंदकिशोर निळकंठतानाजी सावंतजतविक्रम सावंतप्रकाश शेंडगेविलासराव जगतापबाबूराव दुधाळभाऊसाहेब कोळेकररमेश पाटीलसंगमेश तेलीसुरेश शिंदेआटपाडीसदाशिवराव पाटीलअमरसिंह देशमुखगोपीचंद पडळकरअनिल बाबरहणमंतराव देशमुखसुभाष पाटील