शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

शहर एसटी बंदविरोधात आंदोलन

By admin | Updated: September 18, 2016 02:06 IST

नालासोपारा आगारातील एसटी सेवेचे ९ मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत.

वसई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) नालासोपारा आगारातील एसटी सेवेचे ९ मार्ग बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद वसईत उमटले आहेत. त्याच्या विरोधात लढा उभारण्यासाठी जनआंदोलन समिती सरसावली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिने निषेध सभा आयोजिली होती. तोट्याचे कारण देत नालासोपारा आगारातील गास, उमराळे, नाळे, कळंब, भुईगाव, निर्मळ, राजोडी अशा एकूण ९ मार्गांची सेवा बंद केल्याचे एसटीने कळवले आहे. याचबरोबर या मार्गावर महापालिकने परिवहन सेवा सुरू करावी अशी विनंती केली आहे. त्याविरोधात समितीने आंदोलनाची तयारी केली आहे. या मार्गावरील सेवा नफ्यात असतांना त्या बंद करण्याची गरज नव्हती. या निर्णयाविरोधात तसेच वसईतून लढा उभारण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांना एकत्र आणले जात आहे. शुक्रवारी संध्यकाळी निर्मळ येथे सभेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात आंदोलनाटी दिशा ठरवण्यात आली. यावेळी एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी, डॉमणिका डाबरे, समीर वर्तक, रुपेश राड्रीग्ज यांच्यासह कार्यकर्ते आणि प्रवासी संघटनेचे पदाधिकारी हजर होते.या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी चार वाजता नालासोपारा एसटी स्टँडमध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एसटीच्या निर्णाविरोधात आंदोलन करण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)>‘टीम आमची वसई’च्या सूचनाप्रदूषणकारी व त्रासदायक बसेस बंद करुन पालिकेने छोट्या किंवा मोठ्या अधुनिक बसेस आणाव्यात सध्याच्या बसेस जास्त धूर सोडतात. त्याचे ड्रायव्हर फार रफ ड्रायव्हिंग करतात व कंडक्टर प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देतात असा बऱ्याच प्रवाशांना अनुभव आहे. वसई विरार पालिकेच्या बस सकाळी ७ च्या नंतर सुरु होतात आणि रात्री १० नंतर बंद होतात. गावच्या लोकांनी फर्स्ट शिफ्ट, नाईट शिफ्ट करायची कशी? बायका- मुलें येणार जाणार कशी ? महापालिकेचे स्वत:चे बस डेपो ही नाहीत. त्यामुळे बसेस रस्त्यावरच उभ्या राहतात व वाहतूक कोंडी होते. पालिका टु व्हिलर पार्किंगची धड सोय सुद्धा करत नाही. जी आहे ती परवडत नाही आणि खिशाला खार लावून गाड्या पार्किंगमध्ये ठेवल्या तर गाड्या चोरीला जातात. या सर्व मुद्यांवर विचार करून त्यावर तोडगे काढून व अमलात आणूनच एसटीची सेवा बंद करून परिवहन सेवा सुरू करण्याचा विचार पालिकेने करावा अशी सूचना आमची वसई टीमने केली आहे.