शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुख, जीभ आणि स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: February 3, 2017 22:50 IST

भारतात इतर शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - भारतात इतर शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: मुख, जीभ व स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. नागपुरात प्रत्येकी एक लाख लोकांमध्ये १०७ महिला तर ९७ पुरुष कॅन्सरच्या विळख्यात आहे. यातील अनेक रुग्ण मृत्युपंथाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.भारत सरकारने २०१४ मध्ये सादर केलेल्या हेल्थ प्रोफाईल-२०१३च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी कॅन्सरचे १० ते १२ लाख नवे रुग्ण समोर येतात. यातील साधारण सात ते आठ रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. महिलांमध्ये स्तनाचा तर पुरुषांमध्ये मुख व जिभेच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे व मुंबई लोकसंख्येच्या प्रमाणात नागपूर येथे कॅन्सरचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकट्या राजधानीत २२ हजार ८६४ कॅन्सर रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर उपराजधानीत दर लाखात २२९ महिला, तर १८२ पुरुष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.- १८ लोकांमध्ये एकाला कॅन्सरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, नाागपुरात शून्य ते ७४ वयोगटातील १८ स्त्री-पुरुषांमध्ये एकाला कॅन्सर असल्याचे आढळून येते. शून्य ते ६५ हा वयोगट घेतला तर १६ स्त्री-पुरुषांमध्ये एकाला कॅन्सर असल्याचे सामोर येते. - ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ३२ टक्केदेशात १९८२-८३ मध्ये एकूणच कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता. मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबादमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे. -डॉ. क्रिष्णा कांबळे