शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने मन्यारखेडा गावावर शोककळा

By admin | Updated: April 23, 2017 19:43 IST

ट्रॅव्हलमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ घडली़

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 23 -  लहान बहिणीला आळंदीला सोडून पुन्हा जळगावकडे परतणा:या मन्यारखेडा येथील बहिण-भावाचा ट्रॅव्हलमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ घडली़ या घटनेने मन्यारखेडा गावावर शोककळा पसरली आह़े कुटुंबांची जबाबदारी सांभाळणा:या मुला आणि मुलीच्या मृत्यूने वडील सुरेश मराठे यांचा आधार हरपला असून पोटच्या गोळ्य़ांचे मृतदेह पाहून वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता़सुरेश वामन मराठे हे सेवानिवृत्त बसचालक आहेत़ सात वर्षापूर्वी ते परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल. तीन मुली, एक मुलगा, जावई व नातवंडे असा त्यांचा परिवार आह़े खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करून ते कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात़ प्रतिभा, तुलसी या दोघा मुलींचे लग्न झाले असून त्या सासरी नांदत आहेत़ मुलगा गजानन हा वाहनाच्या शोरूममध्ये चालक म्हणून काम करून कुटुंबास हातभार लावत होता़लहान मुलगी पोलीस भरतीला आली होतीमराठे यांची लहान मुलगी तुलसी ही आळंदीला राहत़े पोलीस व्हायची इच्छा असल्याने तिने पोलीस भरतीसाठी जळगावात अर्ज केला होता व भरतीसाठी तुलसी दीड महिन्यांपूर्वी वडिलांकडे जळगावला आली होती़ मैदानी चाचणी, लेखी परीक्षेदरम्यान तुलसीच्या 11 महिन्यांचा चिमुकला, मानसचा मोठी बहिण अरूणा हिने सांभाळ केला होता़ पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याने तुलसीला सोडण्यासाठी 15 रोजी मोठी बहिण अरूणा व भाऊ गजानन हे आळंदीला गेले होत़ेसाखर झोपेतच दोघा बहिण भावांचा करूण अंत22 रोजी रात्री गजानन व अरूणा मराठे हे दोघे   ट्रॅव्हल्सने (एम एच 19 वाय 8001) पुणे येथून जळगावकडे परत येत होत़े दोघे बहिण भाऊ ट्रॅव्हल्सच्या मागील सीटवर बसले होत़े याच सीटखाली ट्रॅव्हलची दोन चाकेही ठेवलेली होती़ गंगापूर तालुक्यातील ढोरेगावनजीक गतिरोधकावर जोरदार दणक्याने दोघा चाकांच्या वजनामुळे तसेच बहिण भाऊ बसलेले सीट  जीर्ण पत्र्यातून जागीच खचल़े याच मागाच्या चाकात आल्याने गजानन व अरूणा यांचा जागीच मृत्यू झाला़जळगावजवळील मन्यारखेडा या गावात ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. संध्याकाळी गावात दोघांचेही मृतदेह आणल्यानंतर सर्वाना शोक अनावर झाला. या वेळी पोटच्या गोळ्य़ांचे मृतदेह पाहून वडील शोकसागरात बुडून त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. बहीण-भावाची अंत्ययात्रा सोबतच निघाल्याचे दृष्य पाहून गावक:यांना आश्रू आवरता आले नाही.