शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीवर शोककळा

By admin | Updated: May 25, 2015 23:08 IST

आजची पहाट तिन्ही गावांमधील या युवकांच्या मृत्यूच्या बातमीने सुरू झाली. त्यानंतर या गावांमध्ये कमालीची शांतता पसरली. तिन्ही गावांमधील व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.

बारामती : आजची पहाट तिन्ही गावांमधील या युवकांच्या मृत्यूच्या बातमीने सुरू झाली. त्यानंतर या गावांमध्ये कमालीची शांतता पसरली. तिन्ही गावांमधील व्यवहार बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला. चौकाचौकांमध्ये ग्रामस्थ एकत्रित येऊन या अपघाताबाबत चर्चा करीत होते. शेखर गवळी हा तरुण बारामती खरेदी-विक्री संघाचे संचालक बापूराव गवळी यांचा मुलगा आहे. त्याच्या मागे आई, वडील, दोन बहिणी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूच्या धक्क्याने वडील बापूराव यांना रक्तदाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावे लागले. तसेच हृषीकेश हा येथील राजेंद्र उपहारगृहाचे मालक पोपट गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, लहान बहीण असा परिवार आहे तर अनिल गवळी यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मोठा भाऊ असा परिवार आहे. देऊळगाव रसाळ येथील बारामती खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ यांचा सागर हा मुलगा होता. तर सागर बाळासाहेब रसाळ हा गिरणी व्यावसायिक, शेतकरी बाळासाहेब रसाळ यांचा एकुलता एक मुलगा होता. तो विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. तर अजित रसाळ हा त्याचा सख्खा चुलतभाऊ आहे. त्याचाही अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचा विवाह झाला असून, त्याला मुलगादेखील आहे. त्याचा परिसरात दूध व्यवसाय, शेती व्यवसाय होता. खराडेवाडी येथील नागेश बाळासाहेब खराडे हा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. याशिवाय घरातील शेतीकाम करून कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळण्यासाठी त्याचा पुढाकार होता.(वार्ताहर)४उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ गावांमधील व्यवहार पूर्ण ठप्प होते. चौकाचौकांत पारावर बसून फक्त अपघात आणि युवकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या चर्चा सुरू होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच शोककळा पसरल्याचे चित्र होते. काही मृतांच्या घरी या अपघाताबाबत माहिती नव्हती. मृत्यूची बातमी त्या युवकांच्या घरी सांगायची कोणी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. तर नियतीसमोर काय करणार, असा सवाल या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केला. ४तिरुपतीच्या सहलीसाठी नेण्यात आलेली स्कॉर्पिओ खराडवाडी परिसरातील भापकर वस्ती येथील होती. गाडी भाडेतत्त्वावर नेण्यात आली होती. मात्र, या स्कॉर्पिओच्या चालकाबाबत एकाही ग्रामस्थाला माहिती नव्हती. तिन्ही गावांमधील ग्रामस्थांनी, त्या सातपैकी चार जण चारचाकी वाहनाचे सराईत चालक होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी गाडी कोण चालवत होता, असा प्रश्न ग्रामस्थांनादेखील पडल्याचे चर्चेतून जाणवले. घरचा आधार गेला...अपघाताची वार्ता समजल्यापासून आम्हाला अवस्थ वाटू लागले आहे. नागेश आमचा जवळचा मित्र होता. घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे, अशी प्रतिक्रिया परशुराम खराडे, गणेश खराडे, सागर खराडे यांनी व्यक्त केली, तर अपघाताची माहिती समजल्यानंतर ‘अन्नाचा घास पोटात गेला नाही, काय होऊन बसलं, कमी वयात नागेश घरचं सगळं पाहत होता. त्यामुळे त्याचं कौतुक होतं,’ अशी प्रतिक्रिया येथील वयोवृद्ध महिला विमल खराडे यांनी व्यक्त केली. सुदैवाने बचावला..अपघातातील ७ तरुणांबरोबर उंडवडी सुपे येथील मोहन गवळी हादेखील जाणार होता. मात्र, ऐनवेळी तो त्यांच्याबरोबर गेला नाही. या दुर्घटनेत गवळी यालादेखील अपघात झाला, असे वृत्त आल्यानंतर काही काळ संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तो बालाजी दर्शनाला गेलाच नाही, असे समजल्यावर ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. तिन्ही गावचे ग्रामस्थ अपघात स्थळाकडे रवानातिरुपती देवस्थानच्या दर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिन्ही गावांमधील युवावर्ग मोठ्या प्रमाणात गावांमध्ये एकत्रित आला. तातडीने तिन्ही गावांमधील युवक आंध्र प्रदेशमधील अपघाताच्या ठिकाणी स्वतंत्र वाहनांमधून रवाना झाले आहेत. या युवकांचे मृतदेह सोमवारी रात्री उशिरा गावामध्ये आणण्यात येणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.