शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

‘एसटी’पुढे ६६ वर्षांत समस्यांचा डोंगर

By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST

प्रवाशांना बदलत्या काळानुसार सेवा देण्यात कमी पडलेल्या एसटी महामंडळापुढे समस्यांचा मोठा डोंगर उभा आहे. कामगारांच्या समस्या, भंगार बसेस आदी प्रश्नातून मार्ग काढत तोटा कमी करण्यासाठी महामंडळापुढे

कामगारांचे प्रश्न :  भंगार बसेस पाचवीला पुजलेल्याविलास गावंडे - यवतमाळप्रवाशांना बदलत्या काळानुसार सेवा देण्यात कमी पडलेल्या एसटी महामंडळापुढे समस्यांचा मोठा  डोंगर उभा आहे. कामगारांच्या समस्या, भंगार बसेस आदी प्रश्नातून मार्ग काढत तोटा कमी  करण्यासाठी महामंडळापुढे सध्या तरी, ठोस अशी कुठलीही योजना नाही. रविवार दि. १ जून रोजी  ६६ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या एसटीकडून जनतेला खूप अपेक्षा आहे. १९४८ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्थापनेनंतर बेडफोर्ड कंपनीची पहिली २४  आसनी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. आज वातानुकुलित बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत.  टू-बाय टू, परिवर्तन, निमआराम, मीडीबसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. महामंडळाचा  राज्यातील डोलारा सांभाळण्यासाठी एक लाख २0 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. २४८ आगार,  ५८0 हून अधिक बसस्थानके, चार हजारावर प्रवासी मार्ग निवारे याद्वारे प्रवाशांना सेवा पुरविली  जात आहे. प्रवाशांना तिकिट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स तिकिट इश्यू मशिनचा वापर केला जात आहे.   अधिकाधिक बसस्थानकांवर संगणकीय आरक्षण सुविधा पुरविण्यात आली. यात्रा, प्रासंगिक  करार, आवडेल तेथे प्रवास व मासिक पास या योजना सुरू करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न  करण्यात आला.१९६८-६९ ते १९८७-८८ अशी २0 वर्षे एसटीच्या उत्कर्षाची गेली. मात्र १९८८  मध्ये मोटर वाहन कायद्यात झालेल्या बदलानंतर पर्यटन परवाने मुक्तपणे देण्यास सुरुवात झाली.  शिवाय परवान्याच्या अटीही पाळल्या जात नव्हत्या. कायदा व न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही या  वाहनांकडून अवैध प्रवासी वाहतूक थांबली नाही. परिणामी १९८८-८९ ते २00५-0६ या १८  वर्षांच्या काळात एसटीला अनेक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागले ते आजही करावे लागत  आहे. डिझेल दरवाढ, टायर आणि सुट्या भागांच्या किंमतीत झालेली वाढ, शासनाचे प्रतिकूल  धोरण आदी कारणांमुळे २0१२-१३ पासून एसटी तोट्यात आहे. शासनाकडे महामंडळाचे १८४0  कोटी थकीत आहे. महामंडळाचा शासनाला हातभार लागत असतानाही पथकर, किफायतशीर  मार्गावरील सेवेमुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई दिली जात नाही. सर्वाधिक १७.५ टक्के प्रवासी कर  महाराष्ट्रात आहे. या सर्व बाबींचा परिणाम कामगारांच्या अतिकालिक भत्त्यात कपात, विविध  आर्थिक लाभांना कात्री, विनावाहक सेवा आदींवर होत आहे.