शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या विकासासाठी सामंजस्य करार

By admin | Updated: July 11, 2017 02:46 IST

मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन संस्थांकडून विविध क्षेत्रांत विकासासाठी प्रकल्प व उपक्रम राबविले जाणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन कौशल्याच्या संवर्धनावर तसेच महानगर क्षेत्रातील स्वस्त खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल. अध्यापन कौशल्य व मिळणारे शिक्षण यांत सुधारणा करण्यासाठी कौशल्य विकास आणि भाषा प्रावीण्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले जातील. हे कार्यक्रम प्रत्यक्ष व डिजिटल अशा दोन्ही स्वरूपांत चालवले जातील, त्यामध्ये सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश केला जाईल, अशी माहिती ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात आली आहे. भारतात येणाऱ्या पर्यटकांची मुंबई महानगर क्षेत्र हीच पहिली पसंत ठरावी, यासाठी क्षेत्रातील रचनात्मक आणि सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘मिक्स द सिटी मुंबई’ या प्रकल्पाद्वारे मुंबईतील वैविध्यपूर्ण संगीताला जागतिक श्रोते मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, या उपक्रमांतर्गत शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्यामध्ये नागरिकांना सहभागी होता येणार आहे.