शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स

By admin | Updated: September 10, 2015 12:32 IST

अपघातग्रस्तांना पहिल्या १० मिनिटांत उपचार मिळावेत, यासाठी मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिली.

मुंबई : अपघातग्रस्तांना पहिल्या १० मिनिटांत उपचार मिळावेत, यासाठी मुंबईत मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिली. त्यासाठी थेट ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि इंग्लडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बुधवारी राज्य सरकार आणि ब्रिटनच्या आरोग्यसेवा यंत्रणेत आरोग्यविषयक सामंजस्य करार झाला. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले की, अपघात व आपत्तीतील जखमींवर उपचारासाठी पहिली १० मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. या कालावधीत उपचार मिळावेत, यासाठी मुंबईत पुढील वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर मोटारबाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्यसेवा दर्जेदार करण्यासाठी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, परिचारिका, डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमही ब्रिटन सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात १०८ क्रमांकाद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येते. मात्र मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी अपघातस्थळी रुग्णवाहिका पोचण्यास अडचणी येतात. त्यामुळे दुर्घटनेतील जखमींवर ‘गोल्डन अवर’पेक्षा ‘प्लॅटिनम टेन मिनिट’ वेळेत उपचार झाले, तर जीवदान मिळू शकते. त्यामुळेच इंग्लडच्या सहकार्याने सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेली मोटार बाइक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत प्रायोगित तत्त्वावर १० ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येईल. या माध्यमातून जखमींना जवळचे रुग्णालय, रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. कशी असेल सेवा ?सामंजस्य कराराअंतर्गत राज्याला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्याकामी इंग्लंडच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सहकार्य मिळणार रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणारडॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण देणारग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार