शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्या मुलींसह मातेची आत्महत्या

By admin | Updated: May 2, 2017 21:46 IST

दोन चिमुकल्या मुलींना गळा दाबून मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली

ऑनलाइन लोकमत हिंगोली, दि. 2 - सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका २६ वर्षीय महिलेने दोन चिमुकल्या मुलींना गळा दाबून मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. दोन्ही मुलीच झाल्याने विवाहितेला सासरची मंडळी त्रास देत असल्याने तिला आपली जीवनयात्रा संपविण्याची वेळ आल्याची तक्रार तिच्या माहेरच्यांनी दिली आहे.सवना येथील आरती प्रवीण नायक (२६) हिचा विवाह मागील चार- पाच वर्षांपूर्वी सवना येथील प्रवीण नागोराव नायक यांच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. सवना येथे १ मे रोजी संत बैरागी बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाचे आयोजन होते. त्यानिमित्त गावातील नागरिक व इतर सर्व जण महाप्रसादाकरिता गेले होते. मयत आरती प्रवीण नायक यांची सासू-सासरे आणि पती हे सर्व तेथेच गेले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास महाप्रसाद घेतल्यानंतर ते घरी आल्यावर त्यांना घरामध्ये आरतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तसेच घरातील पलंगावर पूर्वी प्रवीण नायक (४) व किरण प्रवीण नायक(२) या दोन्ही मुलींचा मृतदेह दिसून आल्याने घरातील लोकांनी एकच आक्रोश केल्याने जवळपासच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेची माहिती गोरेगाव व कन्हेरगाव चौकीत मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे, टी. के. वंजारे, सुनील खिल्लारे, मोहन धाबे, भूमिराज कुंबरेकर, अनिल येडे, अमोल पठाडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी आरती नायक हिचा मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत व दोन्ही चिमुकल्या मुली पलंगावर मृत अवस्थेत दिसून आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अशोक मोराळे यांना मिळताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांना घटनास्थळी रवाना केले. भोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी २ मे रोजी विवाहितेच्या काकाने गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यात पुतणी आरतीला सासरच्या मंडळीकडून त्रास सुरू होता, असे म्हटले. त्यातच तिला दोन्ही मुलीच असल्याने त्यांच्या लग्नाचा खर्च काय तुझा काका देणार का? असे म्हणून वारंवार मारहाण केली जात होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने याबाबत गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली. यात नवरा प्रवीण नायक, सासरा नागोराव नायक, सासू सुनीता, नणंद ज्योती ऊर्फ सीमा देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.