शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

नाशिकमध्ये आईने मुला-मुलीसह संपविली जीवनयात्रा :ह्रदयद्रावक

By admin | Updated: June 25, 2017 19:27 IST

येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ठाणापाडा गावात आईने आपल्या मुला व मुलीसह स्वत:चे आयुष्य संपविल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

आॅनलाइन लोकमत, नाशिक : येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ठाणापाडा गावात आईने आपल्या मुला व मुलीसह स्वत:चे आयुष्य संपविल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेल्या पतीनेदेखील दोन महिन्यांपुर्वी आत्महत्त्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आत्महत्त्या की घातपात या बाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेने संपुर्ण ठाणापाडा हरसूल गावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल गावामध्ये राहणाऱ्या हौसाबाई गिरीधर लोखंडे (३५) यांनी राहत्या घरी मुलगा नीरज (१४), माधुरी (११) यांच्यासह आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले आहे. सहा महिन्यांपुर्वी पती गिरीधर लोखंडे यांनी आत्महत्त्या केल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्या हौसाबाईने स्वत:सह मुलांचेही आयुष्य संपविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री आपल्या मुळाबाळांसह हौसाबाई यांनी जेवण करून घराचा दरवाजा बंद केला तो कायमस्वरुपीच. दिवस उजाडल्यानंतरही हौसाबाई यांचे दार उघडले नाही म्हणून परिसरातील नागरिकांना संशय आला त्यांनी त्यांच्या भावाला याबाबत माहिती दिली. भावाने बहिणीच्या दारावर येऊन खिडकीतून डोकावले असता, बहिण व भाच्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या पायाखालून जमीन घसरली. लोकांनी धीर दिला आणि सदर घटनेची माहिती सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हरसूल पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने ठाणापाडा गाठले आणि राहत्या कौलारू घराच्या वास्यांना लटकलेले मृतदेह खाली काढले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात संध्याकाळी आणले. मुलगा नीरज पाचवीमध्ये तर मुलगी माधुरी ही सातवीमध्ये शिक्षण घेत होती. शेतमजुरी करून लोखंडे कुटुंबिय उदरनिर्वाह करीत होते.