शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बालकासह अपहरण करून आईचा खून

By admin | Updated: June 20, 2016 01:29 IST

ससून शासकीय रुग्णालयामधून बाळंतिणीसाठीचे अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तिच्या २५ दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्यानंतर

पुणे : ससून शासकीय रुग्णालयामधून बाळंतिणीसाठीचे अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तिच्या २५ दिवसांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्यानंतर या महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. बाळ पळवून नेण्यात आले. या बाळाची विक्री करण्यासाठी हे अपहरण आणि खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी बाळाची रविवारी पहाटे सुखरूप सुटका केली.मधू रघुनंदन ठाकूर (वय २५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी निकिता संतोष कांगणे (वय ३०), चंद्रभागा कृष्णा उडानशिवे (वय ३५) लक्ष्मी ऊर्फ पिंकी बालाजी जाधव (वय १९), आकाश उडानशिवे (वय १९, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधु ठाकूर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मधू या गरोदर असताना आरोपी निकिताने अंगणवाडीसेविका असल्याचे सांगत ठाकूर कुटुंबीयांशी ओळख वाढवली. त्यांना प्रसूतीसाठीचा खर्च मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. बाळंत झाल्यानंतर आरोपींनी त्यांना दोन वेळा घरी नेले. त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यांच्या २५ दिवसांच्या बाळाला लस आणि अन्य औषधे देण्याच्या बहाण्याने आरोपी निकिताने मधूचा विश्वास संपादन केला. ससून रुग्णालयातील शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने या चौघांनी त्यांना शुक्रवारी सोबत नेले. मधू दिवसभरात घरी न परतल्याने पती रघुनंदन यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी निकिताला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. बराच वेळ पोलिसांना न बधलेल्या निकिताला चंद्रभागा आणि तिचा मुलगा आकाश ह्यांनी मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. शनिवारी दिवसभर आरोपी पोलिसांना सहकार्य करीत नव्हते. रात्री त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच निकिताने मधूच्या खुनाची कबुली देत तिचा मृतदेह रामटेकडी रेल्वे जंक्शनजवळ टाकल्याचे तिने सांगितले.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनतर बाळाचा शोध सुरू करण्यात आला. हे बाळ लक्ष्मीच्या ताब्यात असल्याचे निकिताकडून समजताच पोलिसांनी काळेपडळ भागात जाऊन लक्ष्मीलाही ताब्यात घेत बाळाची सुखरूप सुटका केली. हे बाळ चंद्रभागा हिला हवे होते. तसेच त्या बाळाची पुढे एका व्यक्तीला विक्री करण्यात येणार होती. या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. मधू आणि तिचा पती रघुनंदन उत्तर प्रदेशातील आहेत. (प्रतिनिधी)