शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

सरकारी शाळांना संजीवनी देण्यासाठी ‘मदर स्कूल’

By admin | Updated: October 27, 2016 01:19 IST

राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या माघारलेल्या शाळांना संजीवनी देण्यासाठी आणि या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणेसाठी राज्य शिक्षण विभागामार्फत

- नितीन गव्हाळे, अकोलाराज्यातील शैक्षणिकदृष्ट्या माघारलेल्या शाळांना संजीवनी देण्यासाठी आणि या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणेसाठी राज्य शिक्षण विभागामार्फत ‘मदर स्कूल’ची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दर्जेदार खासगी शाळांकडे शासकीय शाळांचे मातृत्व सोपविण्यात येणार आहे.कॉन्व्हेंट शाळांकडे विद्यार्थी -पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषद व महापालिका शाळा ओस पडू लागल्या आहेत. परिणामी, या शाळांमधील शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आली आहे. अनेक खासगी शाळांनीसुद्धा त्यांच्या शिक्षण पद्धतीत आणि गुणवत्तेत सुधारणा न केल्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळले आणि सद्य:स्थितीत जे विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्यांचा शिक्षणाचा पाया कच्चा असल्याचे पायाभूत चाचणीच्या माध्यमातून दिसून आले. त्यामुळे या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि कमकुवत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना मिळावी, या दृष्टिकोनातून राज्य शिक्षण विभागाने मदर स्कूलची संकल्पना मांडली. त्यानुसार ज्या दर्जेदार आणि नामांकित शाळांच्या परिसरात शैक्षणिकदृष्ट्या माघारलेल्या शाळा आहेत, या शाळांच्या मातृत्वाची जबाबदारी दर्जेदार आणि नामांकित शाळांना घ्यावी लागणार आहे. शैक्षणिकदृष्ट्या माघारलेल्या व मागासलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मातृत्व स्वीकारून या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी मदर स्कूलची संकल्पना आहे. ही योजना दिवाळीच्या सुट्यांनंतर दुसऱ्या शैक्षणिक सत्रापासून अमलात येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत मदर स्कूल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर शिक्षणाधिकारी दर्जेदार व नामांकित शाळांची निवड करून, त्या शाळांकडे शैक्षणिकदृष्ट्या माघारलेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपवतील आणि त्याचा वेळोवेळी आढावासुद्धा घेण्यात येईल, असे अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक एस. बी. कुळकर्णी यांनी सांगितले.