शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आईला जाळलेल्या बापाला भेटण्यास चिमुकल्यांचा नकार

By admin | Updated: July 25, 2016 20:35 IST

वडगाव कोल्हाटी येथे पतीने जाळलेल्या शांताबाई जाधव या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

चिमुकले अनाथ : पतीने पेटविलेल्या महिलेचा मृत्यूऔरंगाबाद : वडगाव कोल्हाटी येथे पतीने जाळलेल्या शांताबाई जाधव या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे चार चिमुकली मुले पोरकी झाली आहेत. विशेष म्हणजे या चिमुकल्यांनी आईला जाळलेल्या आपल्या वडिलांना अंत्यसंस्काराच्या वेळी भेटण्यासही नकार दिला.

वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेल्या अशोक जाधव याने गुरुवारी मध्यरात्री चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शांताबाईला पेटवून दिले. शंभर टक्के भाजलेल्या शांताबार्इंवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री शांताबाईचा मृत्यू झाला. त्यांना जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी पंचशील महिला बचत गटाच्या मदतीने बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

यावेळी शांताबाईची १० वर्षीय मुलगी राणी व ७ वर्षीय मुलगा दत्तू यांना पोलिसांनी सोबत घेऊन त्यांना आईचे अखेरचे दर्शन घडविले. आणखी दोन मुली अगदीच लहान आहेत. यावेळी या चिमुकल्यांची अवस्था पाहून पोलिसांसह उपस्थित सर्व मंडळींना गहिवरून आले होते. या प्रकरणी अशोकविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन् मुलांनी वडिलांची भेट नाकारली...

आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी दोन मुलांना आणले होते. पत्नी मृत्यू पावल्याचे समजताच अशोकने पत्नीस बघण्याची व मुलांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली. वडिलांच्या भेटीविषयी पोलिसांनी मुलांना विचारले असता, आमच्या आईला आमच्या डोळ्यासमोर ज्याने जाळले, त्याला आम्हाला भेटायचे नाही, असे मुलांनी स्पष्टपणे सांगून वडिलांनी व्यक्त केलेली इच्छा धुडकावून लावली. मुलांनी नकार दिल्याने अशोक ला मुलांना भेटणे तर दूरच; पण पत्नीचा शेवटचा चेहरादेखील पाहता आला नाही, असे सपोनि. राजपूत यांनी सांगितले.