शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जन्मत:च मोतीबिंदूग्रस्त मुलीने सहा वर्षांनी प्रथमच पाहिले आई-वडील

By admin | Updated: February 24, 2015 04:21 IST

कर्जत तालुक्यातील कशेळे गावाजवळच्या पेंढारी आदिवासी वाडीतील गिरी दाम्पत्यांच्या पोटी काही वर्षांपूर्वी जन्मत: मोतीबिंदू असलेली सविता जन्माला आली.

जयंत धुळप, अलिबागकर्जत तालुक्यातील कशेळे गावाजवळच्या पेंढारी आदिवासी वाडीतील गिरी दाम्पत्यांच्या पोटी काही वर्षांपूर्वी जन्मत: मोतीबिंदू असलेली सविता जन्माला आली. त्यामुळे तिच्याबरोबरच गिरी कुटुंबीयांचेही जीवन अंधकारमय झाले होते. मात्र आता तिच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने तब्बल सहा वर्षांनी ती आपल्या पालकांना पाहू शकली.सविता एक वर्षाची असताना तिला व्यवस्थित दिसत नाही, ती घरातल्यांना नीट ओळखू शकत नाही, हे तिचे वडील वाकुल गिरी यांच्या लक्षात आले. घरची बेताची परिस्थिती, आणि आज ना उद्या फरक पडेल, या आशेने त्यांनी सविताचे संगोपन केले. मात्र दृष्टी अत्यंत अधू असल्याने तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तिच्यावर उपचार सुरू असताना कशेळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नेत्रचिकित्सा अधिकारी रमेश पवार यांनी तिची तपासणी केली. प्राथमिक तपासण्यांअंती, सविताला जन्मत:च मोतीबिंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.पवार यांनी सविताच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे सातत्याने प्रबोधन केले आणि गावठी उपचार करण्याऐवजी तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्यावर तिला व्यवस्थित दिसू लागेल, असा विश्वास गिरी दाम्पत्यास दिला. सरकारच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून कशेळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींसाठी विशेष नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात पवार यांनी सविताला आणले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सविताच्या डोळ्यांची तपासणी केली. पुण्यातील एका नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व कशेळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षिका डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी नेत्रचिकित्सा अधिकारी रमेश पवार यांचे अभिनंदन केले आहे; तर आदिवासी गिरी कुटुंबाने त्यांचे आभार कसे मानावे असाच प्रश्न पडल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.