शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

मातापित्याने मारले... तिला स्नेहज्योतीने तारले...!

By admin | Updated: October 15, 2015 00:43 IST

--जागतिक अंध सहाय्यता दिन

शिवाजी गोरे -- दापोली--जन्मत:च पूजा दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याची खात्री पटल्यावर जन्मदाते माता-पिताच तिचे वैरी बनले. जन्मदाते पोटच्या गोळ्याला रात्रीच तिला चिरेखाणीत टाकून निर्दयीपणे निघून गेले. परंतु ‘देव तारी त्याला त्याला कोण मारी’ असे म्हणतात. त्याप्रमाणे पूजाला देवानेच तारले. मंडणगड तालुक्यातील घराडी स्नेहज्योती अंध विद्यालयाने तिचे मातृत्व स्वीकारत, तिला हक्काचा आधार दिला. अंधसहाय्यतेचे याहून दुसरे मोठे उदाहरण काय असणार?चार वर्षांपूर्वी लांजा येथे चिरखाणीत काम करणाऱ्या एका परप्रांतीय जोडप्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु ते बाळ दोन्ही डोळ्यानी अंध असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर अंध बाळाला रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन बेवारसपणे चिरेखाणीत उघड्यावर टाकून हे जोडपे रात्रीच निघून गेले. तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी सामाजिक संस्थेला आवाहन केले होते. या मुलीची बातमी ‘स्नेहज्योती’चे संचालक उत्तम जैन यांना कळली. त्यांनी रत्नागिरी येथे जाऊन त्या बाळाचे पालकत्व स्वीकारल्याची कायदेशीर पूर्तता पूर्ण करुन पूजाला ताब्यात घेतले. त्यावेळी तिचे वय केवळ चार महिन्यांचे होते. आता ती चार वर्षांची झाली आहे. स्नेहज्योतीच तिच्यासाठी पालक झाले आहे.