शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

By admin | Updated: January 17, 2016 02:23 IST

लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादात निवृत्त सैनिकाच्या पत्नीने पोटच्या मुलीसह दोन मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील मियांभाई कॉलनीत हा प्रकार घडला.

अंबाजोगाई (बीड) : लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादात निवृत्त सैनिकाच्या पत्नीने पोटच्या मुलीसह दोन मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील मियांभाई कॉलनीत हा प्रकार घडला.नूरजहाँ शेख फतरू (३८) व त्यांचे पती निवृत्त सैनिक शेख फतरू शेख रज्जाक या दोघांच्याही नातेवाईकांकडे सोमवारी एकाच दिवशी लग्नसोहळा होता. नेमके कोणाच्या लग्नाला जायचे? यावरून दोघांत शुक्रवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर बँकेत सुरक्षा रक्षक असलेले शेख फतरू रात्रपाळीसाठी कामावर गेले. शनिवारी पहाटे रागाच्या भरात नूरजहाँ यांनी मुलगी नेहा शेख फतरू (१४), मुलगा तोहित शेख फतरू (९), अफान शेख फतरू (४) यांना विष पाजून स्वत: गळफास घेतला.शेख फतरू सकाळी कामावरून आल्यानंतर कोणीही घराचे दार उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने दार उघडले. तेव्हा पत्नीसह तीनही मुलांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)विवाहितेचे नातेवाईक संतप्तघटनेनंतर नूरजहाँ यांच्या नातेवाईकांनी शेख फतरू यांच्या भावास मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. माहेरी अंत्यसंस्कार नूरजहाँ यांच्या माहेरच्या मंडळींनी चौघांवरही परळीत अंत्यसंस्कार केले.