शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांना पेटवून देत मातेचीही आत्महत्या ?

By admin | Updated: August 12, 2016 18:41 IST

आमखास मैदान परिसरातील गुलाबवाडी येथे एका घरात महिलेसह तिचे दोन्ही चिमुकले जळालेल्या अवस्थेत आढळून आले

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 12 - शहरातील आमखास मैदान परिसरातील गुलाबवाडी येथे एका घरात महिलेसह तिचे दोन्ही चिमुकले जळालेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. यात आई प्रमिला सचीन गायकवाड (२५) व तिचा एक महिने वयाचा मुलगा प्रफूल या दोघांचा अक्षरश: कोळसा झाला. ते जागीच मरण पावले. तर तीन वर्षीय मुलगी सोनाक्षी गंभीर भाजली आहे. प्राथमिक तपासात मातेनेच काही तरी कारणावरून आपल्या दोन्ही चिमुकल्यांना पेटवून देत स्वत:ही जाळून घेतले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिलाचा पती हा मोलमजुरी करतो. तो कामासाठी बाहेर गेलेला होता. घरी प्रतिला, मुलगा प्रफूल आणि मुलगी सोनाक्षी हे तिघेच होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या नजरेस पडले. शेजाऱ्यांनी गायकवाड यांच्या खोलीकडे धाव घेतली. दरवाजा उघडला. तेव्हा आत प्रमिला आणि चिमुकल्या प्रफूलचा जळाल्याने कोळसा झाल्याचे दिसून आले. तर सोनाक्षी गंभीर भाजलेली असून ती तेथे विव्हळत पडलेली आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. मग अ‍ॅम्ब्यूलन्स बोलावून या तिघांना घाटीत आणण्यात आले. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.