शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

वडिलांपाठोपाठ आईचीही आत्महत्या, २ चिमुकल्या झाल्या पोरक्या

By admin | Updated: June 28, 2016 13:46 IST

कर्जाच्या वाढत्या बोजामुळे पतीने आत्महत्या केल्यानंतर चारच दिवसात पत्नीनेही आत्महत्या केल्याने त्यांच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २८ -  डोक्यावरील कर्जाच्या वाढत्या बोजामुळे पतीने आत्महत्या केल्याला चार दिवस उलटत नाहीत तोच त्याच्या विधवा पत्नीनेही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील पाडोळी ( नायगाव ) येथे घडली आहे. मात्र वडिलांपाठोपाठ आईचे छत्र हरपल्याने त्यांच्या दोन चिमुकल्या मुली मात्र पोरक्या झाल्या आहेत. 
सुप्रिया महेंद्र टेकाळे असे मयत महिलेचे नाव असून पाच दिवसांपूर्वी तिच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली. डोक्यावरील कर्जाच्या वाढत्या बोजा मुळे पाडोळी येथील महेंद्र श्रीराम टेकाळे या 35 वर्षीय शेतकऱ्याने 23 रोजी आत्महत्या केली होती. पतीच्या मृत्यमुळे निराश झालेल्या सुप्रिया यांनी मंगळवारी पहाटे जाळून घेत आत्महत्या केली. त्यांना उपचारांसाठी तातडीने लातूरमधील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 
वडिलांपाठोपाठ आईच्या मृत्यूने त्यांच्या दोन चिमुकल्या मुली मात्र पोरक्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.