शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडीमध्ये सर्वाधिक अदलाबदली

By admin | Updated: January 18, 2017 01:22 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर एकूण ९०९ हरकती नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदला-बदली झाल्याच्या हरकती आल्या आहेत. सर्वात कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती, त्यावर हरकत नोंदविण्याची मंगळवार ही शेवटची मुदत होती. प्रभागरचनेप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्या बनवितानाही राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.निवडणूक कार्यालयनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली. औंध ३१, घोले रोड २२, कोथरूड १०५, वारजे-कर्वेनगर ४९, ढोलेपाटील रस्ता २७, येरवडा १३, वडगावशेरी ५२, भवानी पेठ २४, कसबा-विश्रामबागवाडा ३६, टिळक रोड ५२, सहकारनगर ३३, बिबवेवाडी ५१, धनकवडी ३०७, कोंढवा-वानवडी ३०७, हडपसर ४० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादीच्या आधारे प्रभागनिहाय याद्या यापूर्वीच प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १ जानेवारी २०१७ पर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण होत असलेल्या तरुण-तरुणींच्या तसेच नवमतदारांची नावांची पुरवणी यादींसह पुन्हा प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती नोंदविल्या आल्या आहेत.>याद्या करताना नाही योग्य काळजीस्वारगेट येथील नाईक बी-बियाणे केंद्र, सेवा मित्रमंडळाचा भाग हा प्रभाग क्रमांक १५ मध्ये येत असताना तो प्रभाग १८ मध्ये दाखविण्यात आला. त्याचबरोबर सोन्यामारुती परिसरातील काही भाग प्रभाग १७ मध्ये येत असताना प्रभाग १८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार ऋषी बालगुडे यांनी केली आहे. येरवड्याच्या व्हाइट हाऊस सोसायटीचा परिसर, तसेच रामवाडीचा काही भाग प्रभाग ५ मध्ये येत नसतानाही तो जोडण्यात आल्याची तक्रार आशिष माने यांनी केली आहे. प्रभागनिहाय याद्या करताना प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याचे या तक्रारींवरून स्पष्ट होत आहे.