शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकले ठरतात ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चे सर्वाधिक बळी

By admin | Updated: January 10, 2016 04:57 IST

सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही (पॅसिव्ह स्मोकिंग) धुरामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यात चिमुकले सर्वाधिक बळी पडतात.

- सतीश डोंगरे,  नाशिक

सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही (पॅसिव्ह स्मोकिंग) धुरामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यात चिमुकले सर्वाधिक बळी पडतात. काही तर गर्भाशयातच या विषाला बळी पडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य कल्याण विभाग व वर्ल्ड लंग फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आला आहे. ‘टोबॅको इज इटिंग युवर बेबी अलाईव्ह’ या मोहिमेअंतर्गत राज्यभरात सर्वेक्षण केले गेले. त्यात पॅसिव्ह स्मोकिंगमुळे चिमुकल्यांना होणाऱ्या दुर्धर आजाराचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. पॅसिव्ह स्मोकर्स ठरणाऱ्या गर्भवती महिलांच्या शरीरात सायनाइड आणि कार्बन मोनॉक्साइडसारखे विषारी वायू शिरकाव करतात. त्याचा बाळावर परिणाम होतो. बऱ्याचदा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे मुले गर्भातच दगावण्याची शक्यता असल्याचे यात आढळले आहे. त्यामुळे घरात धूम्रपान करणे धोकादायकच आहे. लहानग्यांवर परिणाम...पॅसिव्ह स्मोकिंगमुळे अस्थमा, कानाचा संसर्ग, न्यूमोनिया, जन्माच्या वेळी नवजात अर्भकांचे वजन कमी होणे, सडन इन्फण्ट डेथ सिंड्रोम (एसआयडीएस) या दुर्धर आजारांसह लहानग्यांच्या प्रकृतीवर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या आजारांचीही लागण होते.  पॅसिव्ह स्मोकिंगमुळे जगभरात वर्षाकाठी ६० हजार लहानग्यांचा बळी जात असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. कुटुंबातीलच व्यक्तींकडून धोका...महाराष्ट्रातील १२ टक्क्यांहून अधिक प्रौढ पुरुष धूम्रपान करतात. यातील बहुतेक पुुरुष घरातच धूम्रपान करीत असल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी पाच दशलक्षहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण आणल्यास यातील दहापैकी एकाचा मृत्यू टाळता येऊ शकतो, असेही सर्वेक्षणात नमूद केले आहे. सर्वेक्षणातील निष्कर्ष...एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असेल, तर साधारणपणे अशा ४० टक्के कुटुंबातील मुले त्यांच्या संपर्कात येतात. तर ५० टक्के मुले सार्वजनिक ठिकाणच्या धुम्रपानाला बळी ठरतात. ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेक्षणात (इंडिया) १३ ते १५ वर्ष वयोगटातील किमान २१ टक्के मुले घरी तर किमान ३६ टक्के मुले घराबाहेरच्या पॅसिव्ह स्मोकिंगला बळी पडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदविला आहे. संशोधनात ७० टक्के व्यक्ती सुट्या सिंगारेट ओढत असल्याचे समोर आले. तरुणाईमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे.