शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बहुतांश आमदार ‘आॅफलाइन’

By admin | Updated: August 30, 2016 06:12 IST

विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘सोशल मीडिया’वर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. नागपूर शहरातील विद्यमान आमदारांनीही तेव्हा ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ प्रचारात आघाडी घेतली होती

योगेश पांडे,  नागपूरविधानसभा निवडणुकांच्या काळात ‘सोशल मीडिया’वर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. नागपूर शहरातील विद्यमान आमदारांनीही तेव्हा ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र निवडून आल्यानंतर दोनच वर्षांच्या आत यातील बहुतांश आमदार ‘आॅफलाइन’ झाले आहेत.निवडणुकांच्या काळात बऱ्याच आमदारांनी कार्यकर्त्यांना ‘सोशल मीडिया’ हाताळण्याची जबाबदारी दिली होती. काही नेत्यांनी तर त्यासाठी विशेष कक्षही स्थापन केला होता. परंतु निवडणुका सरल्या आणि बरेच आमदार या ‘हायटेक’ कट्ट्यापासून दूर झाले आहे.उच्चशिक्षित आमदार ‘डिस्कनेक्ट’ : काही अपवाद वगळता नागपूर शहरातील बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत. परंतु ‘फेसबुक’सारख्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनसंपर्काच्या बाबतीत हेच आमदार माघारले असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख हे ‘सोशल मीडिया’वर अजिबात सक्रिय नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून कार्यकर्त्यांनीच ‘फेसबुक टाइमलाइन’वर जास्त ‘पोस्ट’ टाकलेल्या आहेत. दुसरीकडे कमी शिक्षित कृष्णा खोपडे यांनी मात्र ‘सोशल कनेक्ट’च्या बाबतीत बाजी मारली आहे. ते नियमित मतदारसंघाशी निगडीत विविध बातम्या, मुद्यांवरील मत व सणांच्या शुभेच्छा ‘पोस्ट’ करतात.कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमित (बातम्या, शुभेच्छा, मत)शेवटची ‘पोस्ट’ : २६ आॅगस्ट २०१६विकास कुंभारे (मध्य नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमित (शुभेच्छा, छायाचित्रे)शेवटची ‘पोस्ट’ : २४ आॅगस्ट २०१६सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमितशेवटची ‘पोस्ट’ : १ आॅक्टोबर २०१४डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमितशेवटची ‘पोस्ट’ :२० आॅक्टोबर २०१४सुधाकर देशमुख (पश्चिम नागपूर)‘फेसबुक’वर अपडेट्स: अनियमितशेवटची ‘पोस्ट’ : २५ जानेवारी २०१५अनिल सोले (विधान परिषद)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमितशेवटची ‘पोस्ट’ : ३ जुलै २०१६गिरीश व्यास (विधान परिषद)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमितशेवटची ‘पोस्ट’ : २५ आॅगस्ट २०१६प्रकाश गजभिये (विधान परिषद)‘फेसबुक’वर अपडेट्स: नियमितशेवटची ‘पोस्ट’ : १३ जून २०१६