शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत

By admin | Updated: April 23, 2017 12:32 IST

केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात पुन्हा असह्य़ अशी वाढ केल्यामुळे महागाईचा भडका आणखी उडणार आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात पुन्हा असह्य़ अशी वाढ केल्यामुळे महागाईचा भडका आणखी उडणार आहे. कारण, 77.45 रुपये प्रतिलिटर प्रमाणे देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळणार आहे. आता मुंबईकरांना पेट्रोलसाठी प्रति लिटर 77. 45 रुपये खर्च करावे लागणार आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढविल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून पेट्रोल ३ रुपयांनी महागले. आजपासून पेट्रोलदरात वाढलेल्या जादा दरामुळे नागरिकांवर आणखी बोजा पडला आहे. पुण्यात पेट्रोलचा दर आता 78.2 रुपये प्रतिलिटर तर नागपूरमध्ये प्रति लिटर 77.14 रुपये झाला आहे. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईत पेट्रोल दहा रुपयांनी महाग आहे. दिल्लीमध्ये प्रतिलिटर 68.26 रुपये दराने पेट्रोल मिळते. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रति लिटर पेट्रोलवर 6 रुपये अधिभार लावण्यात येतो. आता राज्य सरकारच्या वित्त मंत्रालयाने अधिभार वाढवून 9 रुपये केला आहे. याचप्रकारे 26 टक्के मूल्यवर्धित कर आणि 9 रुपये अधिभार लावल्यामुळे पेट्रोल तीन रुपयांनी महाग झाले आहे. यापूर्वी 26 टक्के मूल्यवर्धित कर आणि 6 रुपये अधिभार लावला होता. हा अधिभार राज्यात दुष्काळ पडल्यामुळे राज्य सरकारने लावला होता. दुष्काळी भागातील पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी या रकमेचा उपयोग करण्यात येत होता. दुष्काळी मदत अधिभाराची मुदत 31 मार्च 2017 रोजी संपलेली आहे. सद्यस्थितीत राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही, त्यानंतरही अधिभाराची वसुली सुरूच आहे. आता सरकारने दुष्काळी मदत हा शब्द हटवून अधिभार वाढविला आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी जारी केली. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हा निर्णय लागू झाला. नागरिकांना याची कल्पना नसल्याने काही पंपांवर वाद-विवादाचे प्रसंगही उद्भवले