शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

या राज्यात खाल्ली जातात सर्वाधिक बिस्किटे

By admin | Updated: February 26, 2017 18:51 IST

बिस्किट हा पदार्थ मात्र गेल्या काही वर्षात देशातील घराघरात पोहोचला आहे. भारतीय वर्षाकाठी तब्बल

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 26 -  विविधता असलेल्या आपल्या देशात खानपानाच्याही विविध पद्धती आहेत. राज्य प्रांतानुसार त्यात बदल होत असतो. पण बिस्किट हा पदार्थ मात्र गेल्या काही वर्षात देशातील घराघरात पोहोचला आहे. भारतीय वर्षाकाठी तब्बल 36 लाख टन बिस्किटे फस्त करतात, असे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राने सर्वाधिक बिस्किटे खाणाऱ्यांमध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. महाराष्ट्रीयन वर्षाला तब्बल 1 लाख 90 हजार टन बिस्किटे खातात, असे ही आकडेवारी सांगते.
 बिस्किट मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार देशात गतवर्षी 36 लाख टन बिस्किटांची विक्री झाली. बिस्किटांच्या विक्रीत दरवर्षी आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होत असून, दरवर्षी देशभरात तब्बल 37 हजार 500 कोटींची बिस्कीटे विकली जातात. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. 
 याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष हरेश दोषी यांनी सांगितले की आता लोक केवळ चवीसाठी नव्हे तर नाश्ता, आरोग्यसंबंधी कारणे आणि जेवणाच्या जागीही बिस्कीटे खावू लागले आहेत. त्यामुळे बिस्किटांची मागणी सातत्याने वाढत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात केवळ ग्लुकोज बिस्किटे होती. मात्र आता वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे बाजारात आली आहेत. बिस्किटे खाणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा नंबर लागतो. तेथे वर्षाला 1 लाख 85 हजार टन बिस्किटे खाल्ली जातात. तर तामिळनाडूमध्ये एक लाख 11 हजार, पश्चिम बंगालमध्ये एक लाख  दोन हजार तर कर्नाटकात 93 हजार टन बिस्किटे खाल्ली जातात. तर पंजाब आणि हरयाणात सर्वात कमी प्रमाणावर बिस्किटे खाल्ली जातात.