शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महाराष्ट्रात मृत्युदर चढाच!

By admin | Updated: April 23, 2016 03:53 IST

शेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे.

संकेत सातोपे,  मुंबईशेवटच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत असल्या, तरीही ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर आजही शहरी आणि राज्याच्या एकंदर मृत्युदरापेक्षा अधिक आहे. जनगणनेच्या एका अहवालानुसार, १९७१ ते २०१३ या काळात मृत्युदर आटोक्यात आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील मृत्युदरामधील तफावत इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.१९७१ साली राज्याचा मृत्युदर दरहजारी १२.३ होता. मात्र त्याच वर्षी हा दर शहरात ९.७ आणि ग्रामीण भागात १३.५ होता. त्यानंतरच्या दशकात हा दर कमी होत १९८० साली दरहजारी ९.७ एकूण, तर १०.९ ग्रामीण आणि ७.१ शहरी असा झाला. नव्वदच्या दशकात राज्याचा मृत्युदर आणखी कमी होऊन दरहजारी ७.४ वर आला. मात्र त्याही वेळी ग्रामीण महाराष्ट्रातील मृत्युदर ८.५ होता, तर शहरी भागात ५.४ होता.२००० साली हा दर किंचित वाढून दरहजारी ७.५ झाला, याच वर्षी ग्रामीण भागातील दर ८.६, तर शहरी भागातील दर ५.८ असा होता. २०१३मध्ये हा दर आणखी कमी करून राज्याचा एकूण मृत्युदर ६.२ पर्यंत, तर शहरी भागातील मृत्युदर दरहजारी ५ इथपर्यंत खाली आणण्यात शासनाला यश आले. परंतु, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राचा मृत्युदर दरहजारी दोनने अधिक म्हणजे ७.१ इतका राहिला आहे. दर्जेदार सेवासुविधांची उपलब्धता कमी असल्यामुळेच ही तफावत जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.शहरांमध्ये आरोग्य सेवा, मिळकत आणि शिक्षण यांचे प्रमाण ग्रामीण भागांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच शिक्षण-नोकरीसाठी शहरांत स्थलांतरित होणाऱ्या तरुणांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत वृद्धांची संख्या अधिक आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शहरांतील मृत्युदर ग्रामीण भागांच्या तुलनेत कमी आहे. ही परिस्थिती शंभर वर्षांपूर्वीही अशीच होती. ती पालटायची असेल, तर ग्रामीण भागांत केवळ आरोग्य सुविधा देऊन भागणार नाही. अन्य पायाभूत सुविधाही उपलब्ध करून द्याव्या लागतील.- डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते