शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी अधिक अडीचशेवर तडजोड शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:37 IST

कर्नाटकातील दोन साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केल्याने, महाराष्ट्रातील कारखान्यांना तेवढी उचल द्यावीच लागणार आहे.

कोल्हापूर : कर्नाटकातील दोन साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर केल्याने, महाराष्ट्रातील कारखान्यांना तेवढी उचल द्यावीच लागणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३,४०० रुपये पहिली उचल मागितली असली, तरी त्यांनी त्यात लवचिकता ठेवली आहे. कोल्हापुरातील कारखान्यांची सरासरी एफआरपी प्रतिटन २,८०० रुपये आहे. त्यावर अडीचशे रुपये जादा देऊन तडजोड होऊ शकते, पण ही कोंडी फोडण्यासाठी सरकारच्या मध्यस्थीची गरज आहे.यंदाचा गळीत हंगाम बुधवारपासून सुरू होत आहे. महिनाभर कर्नाटकातील हंगाम सुरू असल्याने सीमाभागातील साखर कारखानदार उसाच्या पळवापळवीमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे कारखाने लवकर सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकरी संघटनांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३,५००, खा. राजू शेट्टी यांनी ३,४००, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संघटनेने एफआरपी अधिक ३०० रुपये अशी पहिल्या उचलीची मागणी केली आहे. राज्य सरकारतर्फे गुरुवारी ऊस दराबाबत मुंबईत बैठक होणार आहे. पहिल्या बैठकीत फारशी चर्चा होईल, अशी शक्यता नाही.खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांबरोबरच सरकारलाही अंगावर घेतले आहे. त्यामुळे सरकार आपल्या ताकदीचा वापर करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोंडी करण्याची शक्यता आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुढे करून ते ऊसदराची कोंडी फोडून शेट्टींचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणार, हे निश्चित आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी