शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

मराठवाड्यात आणखी ४ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 5, 2014 03:42 IST

९० टक्के भाजलेल्या यल्लोरे यांच्यावर उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील आणखी चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले तर बीडमध्ये वडिलांचे हाल न पहावल्याने एका शेतकऱ्याच्या मुलाने मृत्यूला कवटाळले. गेल्या चार दिवसांत मराठवाड्यात १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्णातील लोहारा शहरातील मनोहर यल्लोरे (५६) यांनी शेतात सतत नापिकी, सोसायटी व बचतगटाचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. ९० टक्के भाजलेल्या यल्लोरे यांच्यावर उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. कर्जाचा बोजा आणि पायाचे आॅपरेशन करण्यासाठी पैसे नसल्याने गुरुवारी दुपारी मेंढा (ता़उस्मानाबाद) येथील शंकर रामा लांडगे (६०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली़ ते मणक्याच्या आजाराने त्रस्त होते़ सततच्या नापिकीमुळे माळरानावर असलेल्या चार एकरातून हातात काहीच उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते़ सतत होणारी नापिकी आणि दवाखान्याला होणारा खर्च याला कंटाळून लांडगे यांनी गळफास घेतला. बीड तालुक्यातील देवी बाभळगाव येथील श्रीराम सोपान जोगदंड (३८) या शेतकऱ्याच्या मुलाने कापसाचे पीक वाया गेल्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सांयकाळी घडली. औरंगाबाद जिल्ह्णातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव खुर्द येथील सांडू बनकर (४४) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. याच विंवचनेतून बुधवारी रात्री घरात जाऊन गळफास घेतला. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बनकर यांच्यावर महाराष्ट्रग्रामीण बँकेचे १ लाख ३१ हजार ५४६ रुपये कर्ज, तर विविधकार्यकारी सोसायटीचे ७,६०० रुपये असे १ लाख ४० हजारांचे कर्ज आहे. (प्रतिनिधी)