शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

३00 पेक्षा अधिक हरकती, सूचना परिवहन आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 01:58 IST

ओला, उबेरसह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६’चा मसुदा तयार करण्यात आला

मुंबई : ओला, उबेरसह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या टॅक्सी सेवांचे नियमन करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना-२0१६’चा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर शासनाने जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या असून, परिवहन आयुक्तालयाच्या ई-मेलवर ३00 पेक्षा जास्त हरकती व सूचना धडकल्या आहेत. हरकती व सूचनांसाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मोबाइल अ‍ॅपवर आधारित ओला, उबेर यास अन्य खासगी टॅक्सी आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सी यांच्यामधील सेवेचा फरक सध्या धूसर होत चालला आहे. प्रामुख्याने अ‍ॅपवर चालणाऱ्या मोठ्या संख्येतील टॅक्सी आॅल इंडिया पर्यटक परवान्यावर स्थानिक शहर टॅक्सीसारखी सेवा देत आहेत आणि टॅक्सीच्या नियमांमध्ये फरक असल्याने, त्याचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठीच महाराष्ट्र सिटी टॅक्सी योजना नावाने मसुदा तयार केला आणि त्यावर हरकती, तसेच सूचना वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयाच्या पत्त्यावर अथवा ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन केले. आतापर्यंत ३00 पेक्षा जास्त हरकती व सूचना ई-मेलवर प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ५ नोव्हेंबरनंतर सर्व हरकती व सूचनांचा आढावा घेण्यात येईल. आढावा घेतल्यानंतरच योजनेत काही बदल करणे आवश्यक आहे की नाही, त्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. सिटी टॅक्सी योजनेत टुरिस्ट टॅक्सींना स्थानिक पातळीवर सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर, भाडेदराची कमाल व किमान मर्यादा शासनाकडून ठरविली जातानाच, त्याची मर्यादा वाहन प्रकारानुसार केली जाईल. यात प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातही उपाय सुचविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मोबाइल अ‍ॅपवर आधारित ओला, उबेर यास अन्य खासगी टॅक्सी आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सी यांच्यामधील सेवेचा फरक सध्या धूसर होत चालला आहे. प्रामुख्याने अ‍ॅपवर चालणाऱ्या मोठ्या संख्येतील टॅक्सी आॅल इंडिया पर्यटक परवान्यावर स्थानिक शहर टॅक्सीसारखी सेवा देत आहेत आणि टॅक्सीच्या नियमांमध्ये फरक असल्याने त्याचे नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.