शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

महाराष्ट्रात २५ लाखांहून अधिक बालके गुंतली मजुरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:52 IST

एकीकडे जागतिक कामगार दिनानिमित्त श्रमशक्तीचा गौरव केला जात असतानाच बालकामगारांची समस्या अद्यापही गंभीर असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : एकीकडे जागतिक कामगार दिनानिमित्त श्रमशक्तीचा गौरव केला जात असतानाच बालकामगारांची समस्या अद्यापही गंभीर असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजघडीला २५ लाखांहून अधिक बालकामगार आहेत. शेती, मत्स्यव्यवसायासारख्या पारंपरिक उद्योगांसोबतच दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या दुरुस्तीसारख्या आॅटोमोबाइल क्षेत्रात स्वस्त मजूर म्हणून बालकामगारांचा सर्रास वापर केला जात आहे.देशाच्या २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा अभ्यास केला असता शेती, जंगलाशी निगडित विविध कामे, मत्स्य व्यवसाय आणि आॅटोमोबाइल क्षेत्रात सर्रास बालमजुरीचा वापर होतो. महाराष्ट्रात आजमितीला १८ वर्षांखालील सुमारे २५ लाख बालकांना मजुरी करावी लागत आहे. यात पारंपरिक उद्योगांसोबतच रिटेल, आॅटोमोबाइल क्षेत्रातील विविध प्रकारच्या दुरुस्ती आदी नव्याने उदयास येत असलेल्या व्यावसायिक क्षेत्रांचाही समावेश असल्याचे ‘चाइल्ड राइट्स अ‍ॅण्ड यू’ (क्राय)ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.गरिबी, हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक मुलांना शाळा सोडावी लागते. शालेय शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडलेली ही मुले रस्त्यालगतच्या दुचाकी-चारचाकी गाड्यांच्या दुरुस्ती कामात गुंततात. या दुरुस्ती कामासाठी स्वस्त मजूर म्हणून मोठ्या प्रमाणावर बालकामगारांचा वापर केला जातो. आॅटोमोबाइल क्षेत्रातील बालमजुरीतही उत्तर प्रदेशचा क्रमांक देशात पहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.२०११ च्या जनगणनेनुसार ५ ते ११ वयोगटातील मजुरांची संख्या एक कोटीच्या आसपास आहे. २००१ च्या तुलनेत यात तब्बल २० टक्क्यांची घट आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात बालमजुरीचे प्रकार अधिक आढळून येतात. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींना मजुरीला जुंपण्याचे प्रकार अधिक असल्याचे क्रायने आपल्या अहवालात म्हटले आहे.महाराष्टÑ पाचव्या क्रमांकावर : बालमजुरीत उत्तर प्रदेशचा क्रमांक वरचा आहे. त्यापाठोपाठ विविध क्षेत्रांत महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात १८.१ टक्के बालकांना शेतीकामात जुंपण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात हीच टक्केवारी ६.८ आहे. यात मत्स्यव्यवसायात गुंतलेल्या बालकांचाही समावेश करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रातील बालमजुरीबाबत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या लहानग्यांची संख्या ७.४ टक्के आहे, तर मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ५.१ टक्का बालमजुरी आढळून आल्याचे क्रायने स्पष्ट केले आहे.