शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रमेश कदमविरोधात आणखी १२७ कोटींचे पुरावे

By admin | Updated: March 4, 2016 03:34 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांच्या विरोधात आणखी १२७ कोटी रुपयांचे घोटाळा केल्याचे पुरावे गुन्हे अन्वेषन विभागाला

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांच्या विरोधात आणखी १२७ कोटी रुपयांचे घोटाळा केल्याचे पुरावे गुन्हे अन्वेषन विभागाला (सीआयडी) सापडले असून, पुरवणी आरोपपत्र लवकरच न्यायालयात सादर करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.महामंडळात आतापर्यंत ३८५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. त्यासंदर्भात न्यायालयात कदमविरोधात अगोदरच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्या वेळी आणखी घोटाळ्याची कागदपत्रे सापडण्याची शक्यता असल्याने पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी सीआयडीने न्यायालयाकडे मागितली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार सीआयडीने केलेल्या तपासात आणखी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची कागदपत्रे सापडली आहेत, अशी माहिती मंत्री कांबळे यांनी दिली.या आर्थिक घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग आहेच. या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. त्यांच्या सहभागाची कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर पुराव्यानिशी पवार यांच्याविरोधात बोलेल आणि ही कारवाई लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले.> ‘त्या’ आलिशान गाड्यांचा होणार लिलावरमेश कदम यांनी महामंडळातून कर्ज काढून देत त्यातून आलिशान महागड्या आॅडी, बीएमडब्ल्यू या गाड्या घेतल्या आणि त्या परस्पर राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या, असे सांगत दिलीप कांबळे म्हणाले, सीआयडीने केलेल्या तपासात आतापर्यंत अशा ६० गाड्या आढळून आल्या आहेत. त्या सर्व जप्त करण्यात आल्या आहेत. महामंडळाने गाडी घेण्यासाठी ज्यांना कर्ज दिले त्यांनी तो निधी परस्पर या आलिशान गाड्यांच्या डिलरला दिला आणि त्या गाड्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. गाड्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांचा लिलाव करून ती रक्कम महामंडळाला मिळावी, अशी विनंती सीआयडीने केली होती. ती मान्य करण्यात आली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.