शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
3
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
4
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
5
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
6
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
7
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
8
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
11
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
12
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
13
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
14
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
15
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
16
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
18
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
19
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
20
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!

विमानतळविरोधी शेतकऱ्यांचा मंत्री शिवतारेंच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: December 27, 2016 01:07 IST

पुरंदरमधील विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांचा विरोध तीव्र होत असून, तेथील ग्रामस्थ सासवड येथे आंदोलन करीत आहेत. सोमवारी त्यांनी पुणे-पंढरपूर हा राष्ट्रीय

सासवड (जि. पुणे): पुरंदरमधील विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांचा विरोध तीव्र होत असून, तेथील ग्रामस्थ सासवड येथे आंदोलन करीत आहेत. सोमवारी त्यांनी पुणे-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग दीड तास रोखून धरत तीव्र आंदोलन केले. विमानाची अंत्ययात्रा काढून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या घरावर मोर्चा नेला. शासन विमानतळाचा हा प्रकल्प रद्द रद्द करीत नाही, तोपर्यंत आंदोलने करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने या वेळी दिला. बाधितांच्या भावनांची कोणतीही दखल न घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे नवीन विमानतळ पुरंदरला होणार असल्याची घोषणा केली, तसेच जिल्हाधिकारीदेखील याबाबत शासकीय अधिकारी आणि बाधित गावांतील सरपंच व प्रमुखांची समिती केल्याची खोटी घोषणा करतात. तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्याला पाठिंबा देतात, असे सांगत शासन, लोकप्रतिनिधी आणि काही फुटीर लोकांचा या वेळी निषेध करण्यात आला. विमानतळामुळे बाधित होत असलेल्या मेमाणे-पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडीसह १० गावांतील हजारो बाधित शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाला पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी पाठिंबा दिला. याचबरोबर, मेधा पाटकर यांच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. तहसीलदार सचिन गिरी यांनी आंदोलनाच्या स्थळी जाऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. (प्रतिनिधी)