शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ !

By admin | Updated: November 13, 2016 19:25 IST

पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 13 - पृथ्वीभोवती एक महिन्यात एक प्रदक्षिणा करणारा चंद्र दररोज विविध कलांच्या माध्यमातून १२ अंश या प्रमाणात फिरतो. आपल्या कक्षेतून भ्रमण करताना चंद्र व पृथ्वी यातील अंतर कमी-अधिक होत असल्याने चंद्रप्रकाशातही बदल होत असतो. सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी व चंद्र यामधील अंतर सर्वात कमी राहणार असून, चंद्रबिंब मोठ्या आकाराचे दिसणार आहे. या खगोलिय चमत्काराचा आनंद अवकाश निरीक्षकांनी लुटावा, असे आवाहन निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.एकंदर ८८ तारकासमुहांच्या आकाशात विविध मनोहारी घटना अधूनमधून घडत असतात. या घटना पाहण्याची इच्छा खगोल प्रेमींना असते. याआधी चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येण्याची घटना १९४८ मध्ये घडली होती. यापुढे ही स्थिती २०३४ मध्ये पहावयास मिळणार आहे. आपला चंद्र प्रत्येक राशीत २ पूर्णांक एक चतुर्थांश दिवस मुक्कामी राहून एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण १२ राशींचे चक्र पूर्ण करतो. यामुळे आकाशातील प्रत्यक्ष दिसणाऱ्या राशींची माहिती व त्यांच्या दर्शनाचा आनंद देण्यास चंद्र मदतच करतो. याच राशी चक्रातून सर्व ग्रह फिरत असल्याने दरमहा चंद्र प्रत्येक ग्रहाजवळ येतो. यालाच आपण चंद्राची त्या ग्रहसोबत युती झाल्याचे संबोधतो. चांद्र मासातील प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा त्या-त्या नक्षत्रात बघता येऊ शकतो. तसाच तो या कार्तिक पौर्णिमेला आकाशातील कृतिका या नक्षत्राजवळ पाहता येईल. (प्रतिनिधी)सुपरमूनचा घ्या अनुभवया घटनेलाच सुपरमूनसुद्धा म्हटल्या जाते. या स्थितीत पृथ्वी व चंद्र यामधील अंतर केवळ ३ लाख ५० हजार किलोमिटर एवढे कमी असते. त्यामुळे चंद्राचा लख्ख प्रकाश पृथ्वीवर पडतो. या खगोलीय घटनेचा अनुभव घेणे निश्चितच अवर्णनिय राहणार आहे. - ही खगोलीय घटना ६८ वर्षांनंतर होत आहे. कार्तिक पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी यामधील अंतर कमी होऊन, चंद्र बिंब मोठे दिसणार आहे. दुर्मिळ असलेली ही स्थिती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे. - प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, अकोला