शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून आला उंबरठ्यावर!

By admin | Updated: June 10, 2016 04:57 IST

मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने येत्या ४८ तासांत तो कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल,

पुणे : मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने येत्या ४८ तासांत तो कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची वेगाने आगेकूच होत असून गुरुवारी तो कर्नाटक, तमिळनाडूत हजेरी लावली.मान्सून केरळमध्ये थोडा उशिरा ८ जूनला दाखल झाल्यानंतर त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती कायम आहे. गुरुवारी आगेकूच करीत मान्सूनने केरळ व तामिळनाडू राज्यांचा उर्वरित भाग, कर्नाटक राज्याची किनारपट्टी व इतर भाग, रायलसीमा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी, बंगालच्या उपसागराचा मध्य भाग, आरबी समुद्राच्या मध्य भाग व्यापला. पुढील २ दिवसांत तो गोवा आणि कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल, असे सध्याचे चित्र आहे.गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मालवण येथे सर्वाधिक १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ खेड, कुडाळ येथे ८०, पेडणे येथे ७०, श्रीवर्धन येथे ६०, कणकवली, संगमेश्वर, देवरूख, सावंतवाडी येथे ५०, महाड, तळा येथे ४०, रोहा, सांगे येथे ३०, देवगड, मुरूड, पोलादपूर, वेंगुर्ला येथे २० तर माणगाव, रत्नागिरी, वैभववाडी येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची संततधार सुरू असल्याने कोकणवासीय सध्या ‘पाऊस इलो, पाऊस इलो’ असा जयघोष करीत चिंब होण्याचा आनंद लुटत आहेत. मुंबईसह उर्वरित राज्यातील नागरिक मात्र मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांच्या तोंडावर पाऊस कधी येणार, याचीच चिंता दाटून राहिली आहे. (प्रतिनिधी)