शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मान्सूनचा संडे मूड!

By admin | Updated: June 27, 2016 05:18 IST

गेल्या ४८ तासांपासून मुंबई आणि उपनगराला चिंब करणाऱ्या पावसाने रविवारीही आपला मुक्काम कायम ठेवला.

मुंबई : गेल्या ४८ तासांपासून मुंबई आणि उपनगराला चिंब करणाऱ्या पावसाने रविवारीही आपला मुक्काम कायम ठेवला. सकाळपासून कधी मुसळधार तर कधी रिमझिम असा ठेका धरणाऱ्या पावसाने सायंकाळपर्यंत मारा कायम ठेवल्याने मान्सूनचे टपोरे थेंब अंगावर झेलत मुंबईकरांनी रविवारची सुट्टी सत्कारणी लावली. सरींचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राईव्हसह वरळी सी-फेस आणि जुहू समुद्र किनारी मुंबईकरांनी गर्दी केल्याने मान्सून मूडला उधाण आल्याचे चित्र होते.मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी, शनिवारी पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या वेगवान माऱ्यामुळे मागील दोन दिवसांपासून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला थोडाफार ब्रेक लागला असला तरी रविवारच्या सुट्टीदिवशी मुंबईकर पावसात मनसोक्त भिजत मान्सूनचा आनंद लुटण्यासाठी सकाळपासूनच समुद्र किनारी दाखल झाले. या ठिकाणी दुर्घटना घडू नये म्हणून जीवरक्षकांसह पुरेसे पोलीसही तैनात करण्यात आले होते. त्याचवेळी ठिकठिकाणच्या मैदानात भर पावसात फुटबॉलसह क्रिकेटचे डावही रंगले होते. बच्चे कंपनीनेही पाण्यात कागदी होड्या सोडत पावसाचा आनंद लुटला.शहर व उपनगरात ठिकठिकाणी पडझडीच्या १५ घटना घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात २, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १७ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर शहरात ४, पूर्व उपनगरात ६ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडल्याच्या घटना घडल्या. (प्रतिनिधी)>७८ झाडे पडली; दरडही कोसळलीभोईवाडा येथे दरड कोसळली असून सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही. शहरात १, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ४ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर मुंबई शहरात १२, पूर्व उपनगरात २३ आणि पश्चिम उपनगरात ४३ अशी एकूण ७८ झाडे पडल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. >बाळापुरात ढगफुटी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर व परिसरात शनिवारी मध्यरात्री दोन तासांत रेकॉर्डब्रेक १२७ मि.मी. पाऊस झाला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दीड तास बंद होती. पुरामुळे बाळापूर हद्दीतील ५० हेक्टर व शेवाळा शिवारातील १२५ हेक्टर शेती वाहून गेली.>परभणीला झोडपले लातूर जिल्ह्यात आणि राणीसावरगाव परिसरात झालेल्या पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी आणि गळाटी या दोन नद्यांना पूर आल्याने सहा गावांचा संपर्क तीन तासांसाठी तुटला होता़ पालम ते जांभूळबेट या रस्त्यावर पालम शहरानजिक लेंडी ही नदी आहे़ परभणी शहरासह परिसरात शनिवारी रात्री ४३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे़ तर, नांदेड शहर, जिल्ह्यात सरासरी २२.९६ मि.मी. पाऊस झाला. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे. >अंदाज काय सांगतो?रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे १, कोल्हापूर ०़९, महाबळेश्वर १५, सांगली २, मुंबई २६, अलिबाग १८, रत्नागिरी ७३, डहाणु ३१, अमरावती १०, ब्रम्हपुरी ४, नागपूर ८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ २७, २८ व २९ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़