शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूून मुंबईत!

By admin | Updated: June 16, 2014 03:41 IST

नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आज पुणे-मुंबईसह पूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला.

मुंबई/पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आज पुणे-मुंबईसह पूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला. यंदा मान्सूनने येण्यास ८ दिवस उशीर केला. याचबरोबर रविवारी मान्सूनने गुजरातचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीतही ‘एन्ट्री’ केली. पुढील २ ते ३ दिवस मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागात पोहोचण्यास अनुकूल स्थिती नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.यंदा मान्सून ३ दिवस उशिरा, १० जूनला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला होता. त्याच काळात अरबी समुद्रात आलेल्या नानौक चक्रीवादळामुळे मान्सूनला महाराष्ट्रात आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थितीच नव्हती. हे चक्रीवादळ आज विरले. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूलता वाढली आणि त्याने महाराष्ट्रासह गुजरातमध्येही आगमन केले. रविवारी दिवसभरात मान्सूनने पूर्ण सांगली जिल्हा, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग व्यापला. पुढील २ ते ३ दिवसात मान्सूनला पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा या राज्यांसह कर्नाटक, आंध ्रप्रदेश, सिक्कीम या राज्यांच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, अशी माहिती डॉ. खोले यांनी दिली.कर्नाटक, तामिळनाडू, ईशान्येकडील राज्ये या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात इम्फाळमध्ये १२० मिमी, जबलपूरमध्ये ८०, पणजीमध्ये ७०, वेंगुर्ल्यात ६०, कारवार, पोरबंदर येथे ५०, अलिबागमध्ये ३०, रायपूर, मेंगलोर, मुंबई, कोलकाता, कार-निकोबार बेटांवर २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)