शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून कोकणात

By admin | Updated: June 12, 2014 03:01 IST

दरमजल करीत पुढे सरकरणारा मान्सून अखेर बुधवारी कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले

मुंबई : दरमजल करीत पुढे सरकरणारा मान्सून अखेर बुधवारी कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून, हा नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र आणि कोकणच्या उर्वरित भागात पुढील २४ तासांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तर सीमा बुधवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने बुधवारी मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तटीय कर्नाटकाचा उर्वरित भाग आणि संपूर्ण गोव्यासह कोकणचा काही भाग व्यापला आहे. तर मध्य-पूर्व अरबी समुदात असलेले ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘नानौक’ या चक्रीवादळात झाले आहे. याचा परिणाम म्हणून पुढील चोवीस तासांसाठी मुंबईवरील आकाश ढगाळ राहील. आणि मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार वारे वाहतील, असा इशाराही भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.दरम्यान, विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)