शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० ते १२ जूनपर्यंत मान्सून

By admin | Updated: June 2, 2016 03:12 IST

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल आतापर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात झाली असून, पुढील २ ते ३ दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व पूर्व मध्य बंगालच्या

मान्सूनच्या वाटचालीस परिस्थिती अनुकूलपुणे : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल आतापर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात झाली असून, पुढील २ ते ३ दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत होण्यास मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे़ त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या जनतेला लवकरच दिलासा मिळणार आहे.गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ पुढील दोन दिवसांत राज्याच्या तुरळक भागांत पाऊस पडण्याची शक्यता असून, ४ व ५ जूनला दक्षिण कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत, तर राज्यात उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ पुणे व परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३७़७, जळगाव ४१़४, कोल्हापूर ३५़८, महाबळेश्वर ३०़७, मालेगाव ४१़२, नाशिक ३७़२, सांगली ३८़४, सातारा ३७़६, सोलापूर ४०़१, मुंबई ३५, अलिबाग ३३़४, रत्नागिरी ३६़२, पणजी ३५़२, डहाणू ३४, औरंगाबाद ४०, परभणी ४३़१, नांदेड ४२़५, अकोला ४२़६, अमरावती ४२़८, ब्रह्मपुरी ३९़५, चंद्रपूर ४४़८, गोंदिया ४३़५, नागपूर ४५़८, वर्धा ४५़५, यवतमाळ ४२़८़ यावर्षी महाराष्ट्रामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस पडणार आहे़ मान्सूनचे केरळमध्ये ७ जूनला आगमन होणार आहे़ महाराष्ट्रामध्ये येत्या १० ते १२ जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी सांगितले़