शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला मान्सूनपूर्व सरींचा इशारा

By admin | Updated: June 1, 2017 04:15 IST

मंगळवारी केरळात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होत असतानाच हवामानातील बदलामुळे येत्या ४८ तासांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंगळवारी केरळात दाखल झालेल्या मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होत असतानाच हवामानातील बदलामुळे येत्या ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडेल, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २८ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असतानाच दुसरीकडे वाढत्या उकाड्यानेही मुंबईकरांना घाम फुटत आहे.मान्सून केरळात दाखल झाला असतानाच निर्माण झालेल्या ‘मोरा’ या चक्रीवादळाची तीव्रताही कमी झाली असून, त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरावर ढग दाटून येत आहेत. शिवाय हवामानात बदल होत असून, आर्द्रतेमधील चढ-उतारासह हवेतील बाष्प कमी होत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. परिणामी, वाढता उकाडा मुंबईकरांना घाम फोडत असून, मान्सून मुंबईत दाखल होईपर्यंत येथील वातावरण कायम राहील.